तिकीट नाकारल्याने ‘आप’चा नेता चढला टॉवरवर | पुढारी

तिकीट नाकारल्याने ‘आप’चा नेता चढला टॉवरवर

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या यादीत आपले नाव नसल्याने संतापलेल्या एका माजी नगरसेवकाने चक्क विजेच्या टॉवरवर चढत आपला रोष व्यक्त केला.

त्यांची कागदपत्रे परत देण्याचे आश्वासन मिळाल्यावर ते खाली उतरले.  माजी नगरसेवक हसीब उल हसन यांनी रविवारी हे आंदोलन केले. ते शास्त्री पार्क मेट्रो स्टेशनजवळच्या टॉवरवर चढले व तेथून सोशल मीडियावर लाईव्ह येत आपल्यावरील अन्यायाची कहाणी सांगितली.

Back to top button