मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचे ऑनलाइन RTI पोर्टल पुढील आठवड्यात सुरू होणार : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड | पुढारी

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचे ऑनलाइन RTI पोर्टल पुढील आठवड्यात सुरू होणार : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : आम्ही पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचे ऑनलाइन RTI पोर्टल सुरू करू, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले आहे. आम्ही ऑनलाइन आरटीआय पोर्टल सुरू करणार आहोत. आम्ही उच्च न्यायालयाला निर्देश जारी करू शकत नाही. कारण ज्याची आम्हीच अद्याप अंमलबजावणी करू शकलो नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

याआधी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की ते लवकरच एक ऑनलाइन RTI पोर्टल सुरू करणार आहोत ज्याचा वापर सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित माहिती आरटीआय कायद्यातर्गंत अर्ज दाखल करण्यासाठी लोक करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचे ऑनलाइन आरटीआय पोर्टल सुरु करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने हा खुलासा केला होता.

“आपण अधिकार्‍यांशी बोललो आहे. आरटीआय पोर्टल तयार आहे आणि ते लवकरच कार्यान्वित केले जाईल.” असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगत आकृती अग्रवाल या महिलेने दाखल केलेली याचिका निकाली काढली. नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाइन आरटीआय पोर्टलची मागणी करणारी अशीच एक याचिका फेटाळून लावली होती. सध्या सर्वोच्च न्यायालयाकडे आरटीआय अर्ज हे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून दाखल करावे लागतात. ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर पोस्टाच्या माध्यमातून अर्ज दाखल करावे लागणार नाहीत.

हे ही वाचा :

Back to top button