Earthquake : अमृतसरमध्ये 4.1 तीव्रतेचा भूकंप | पुढारी

Earthquake : अमृतसरमध्ये 4.1 तीव्रतेचा भूकंप

पुढारी ऑलाइन डेस्क : Earthquake : पंजाबमधील अमृतसरपासून पश्चिम-वायव्येला १४५ किमी अंतरावर आज सोमवारी (दि.१४) पहाटे ३ वाजून ४२ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल इतकी होती.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र पंजाब ते पाकिस्तानपर्यंत असून त्याची खोली १२० किमी असल्याचं सांगितले आहे. याआधीही दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या आठवड्यात दोन वेळेस भूकंपाचे धक्के बसले होते. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणताही जीवित हानी झाल्याची अद्याप महिती मिळालेली नाही.

याआधी गेल्या एका आठवड्यात १२ नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. हा भूकंप नागरिक त्याच्या घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडताना झाला होता. तर दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, बिजनौरमध्ये देखील भूकंपाचे धक्के बसले होते. तर ९ नोव्हेंबरला भारत, चीन आणि नेपाळमध्ये भूकंपाचे धक्का बसला असून त्यांची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. नेपाळमधील भूकंपादरम्यान अनेक घरे उद्ध्वस्त होवून ६ जणांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा :

कोल्हापूर : नाईट लँडिंगला प्रारंभ; उद्योगमंत्री उदय सामंत कुटुंबीयांसह खासगी विमानाने तिरुपतीकडे रवाना

भूकंपाने दिल्ली पुन्हा हादरली, ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप 

Back to top button