HP Assembly Elections : हिमाचल प्रदेशात मतदानाला सुरुवात, ४१२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार | पुढारी

HP Assembly Elections : हिमाचल प्रदेशात मतदानाला सुरुवात, ४१२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : HP Assembly Elections : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी आज १२ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मतदानस सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला असून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. राज्यातील ५५,९२,८२८ मतदान आज ईव्हीएममध्ये कैद होणार असल्याने निवडणूक रिंगणात उतरलेल्या ४१२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. यामध्ये २४ महिलांचा समावेश आहे. मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.

HP Assembly Elections : हिमाचल प्रदेशातील एकूण मतदारांपैकी ६७ हजार ५५९ सेवा मतदार, २२ परदेशी भारतीय मतदार आणि ५५ लाख २५ हजार २४७ सामान्य मतदार आहेत. राज्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. यामध्ये २८५४९४५ महिला, २७३७८४५ पुरुष आणि ३८ तृतीय लिंग मतदार आहेत. मतदानासाठी परदेशी मतदारांना मूळ पासपोर्ट दाखवावा लागणार आहे. ज्यांचा पासपोर्टच्या तपशीलानुसार लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत मतदार यादीत समावेश आहे.

HP Assembly Elections : दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी मतदान करण्यापूर्वी मंडीतील सराज येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचल विधानसभा निवडणुकीत महिला आणि तरुणांना अधिकाधिक मतदान करून मजबूत सरकार निवडण्याचे आवाहन केले आहे. हिमाचल प्रदेशातील सर्व ६८ विधानसभा जागांसाठी मतदान सुरु झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button