असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करणार्‍या दोन्ही आरोपींचा जामीन रद्द | पुढारी

असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करणार्‍या दोन्ही आरोपींचा जामीन रद्द

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : एमआयएम नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करणार्‍या दोन्ही आरोपींचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. येत्या आठवडाभरात दोन्ही आरोपींनी शरण यावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले. सचिन शर्मा आणि शुभम गुर्जर नावाच्या या आरोपींना अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर ते दोघे तुरुंगातून बाहेर आले होते.

सदर प्रकरणात असलेले पुरावे लक्षात घेता अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपींच्या जामीनअर्जावर विचार करावा, अशी टिप्पणी न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने केली. आरोपींना जामीन देताना उच्च न्यायालयाने कोणतेही कारण दिलेले नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ओवेसीच्या गाडीवर हापूड टोल नाक्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात ओवेसी वाचले होते. सदर घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दोनपैकी एका आरोपीला घटना स्थळावरच पकडण्यात आले होते. तर दुसरा पोलिसांना शरण आला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करीत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा  

Back to top button