Elephant Drink liquor : देशी महुआ दारू पिऊन 24 हत्ती ‘गाढ’ झोपले अन् वनविभागाने ढोल वाजवले | पुढारी

Elephant Drink liquor : देशी महुआ दारू पिऊन 24 हत्ती 'गाढ' झोपले अन् वनविभागाने ढोल वाजवले

पुढारी ऑनलाइन डेस्क : Elephant Drink liquor : ओडिसातील जंगलात देशी दारू बनवण्यासाठी आंबवलेल्या महुच्या फुलांचे पाणी पिऊन 24 हत्तींचा कळप गाढ झोपी गेला. ही घटना केओंझार जिल्ह्यातील शिलीपाडा काजूच्या जंगलाजवळ घडली. गावक-यांनी हत्तींना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ते अयशस्वी ठरले. शेवटी वनविभागाने ढोल वाजवून हत्तींना जागे केले.

Elephant Drink liquor : महुआच्या झाडाची फुले (मधुका लाँगिफोलिया) एक अल्कोहोलयुक्त पेय तयार करण्यासाठी आंबवले जातात ज्याला महुआ देखील म्हणतात. भारताच्या विविध भागांतील आदिवासी स्त्री-पुरुष परंपरेने ही दारू बनवतात. ओडिसाच्या केओंझार जिल्ह्यातील शिलीपाडा काजूच्या जंगलाजवळ राहणारे गावकरी महुआच्या फुलापासून दारू बनवतात. त्यांनी ही दारू बनवण्यासाठी महुआची फुले आंबण्यासाठी मोठ्या भांड्यात पाण्यात टाकून ठेवली होती. मात्र हे आंबलेले पाणी जंगलातील 24 हत्तींच्या कळपाने पिऊन ते मद्यधुंद अवस्थेत झोपले.

Elephant Drink liquor : याबाबत गावकरी नारिया सेठी याने सांगितले, ” महुआ तयार करण्यासाठी आम्ही सकाळी 6 वाजता जंगलात गेलो आणि पाहिले की सर्व भांडी तुटलेली आहेत आणि आंबवलेले पाणी गायब आहे. हत्ती झोपलेले असल्याचेही आम्हाला आढळून आले. त्यांनी आंबवलेले पाणी पिले आणि फुले खाल्ली, कळपात एकूण नऊ टस्कर, सहा मादी आणि नऊ बछडे होते.”

आणखी माहिती देताना तो म्हणाला, ती दारू प्रक्रिया न केलेली होती. आम्ही प्राण्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी झालो. त्यानंतर आम्ही वनविभागाला माहिती दिली.

Elephant Drink liquor : माहिती मिळताच पाटणा वनपरिक्षेत्रांगर्त जंगलात घटनास्थळी पोहोचल्यानंतर वनविभागाच्या कर्मचा-यांना कळपाला जागे करण्यासाठी ढोल वाजवावे लागले. ढोलच्या आवाजाने उठल्यानंतर हत्ती जंगलात निघून गेले, असे वन परिरक्षक घाशीराम पात्रा यांनी सांगितले. सकाळी 10 वाजता कळप तेथून निघून गेला.

Elephant Drink liquor : आंबवलेला महुआ खाल्ल्यानंतर हत्ती मद्यधूंद अवस्थेत होते की नाही, याबाबत मात्र, खात्री देता येत नाही, असे वनअधिका-यांनी सांगितले. पात्रा यांच्या मते कदाचित ते तेथे विश्रांती घेत होते. तर दुसरीकडे ग्रामस्थांचे म्हणणे होते की त्यांनी मंगळवारी तुटलेल्या कुंड्यांच्या जवळ विविध ठिकाणी हत्तींना मद्यधुंद अवस्थेत झोपलेले पाहिले.

हे ही वाचा:

संजय राऊत यांच्या जामिन स्थगितीवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

पुणे : निवडणूक आयोग डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करणार

Back to top button