पुणे; पुढारी वृत्तसेवा : तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी प्रक्रिया अतिशय सोपी केली असून तंत्रज्ञान, जन्म दाखला आदी समस्यांवर मार्ग काढला जाईल. आपले म्हणणे, समस्या मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे त्यांनी तृतीयपंथी घटकांशी संवाद साधला. या वेळी निवडणूक उपायुक्त हृदयेश कुमार, निवडणूक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ. रणबीर सिंग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सदस्या दिलशाद मुजावर आदी उपस्थित होते.
कुमार म्हणाले, निवडणूक प्रक्रियेबाबतच्या तृतीयपंथी घटकांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधत आहोत. निवडणूक प्रकियेच्या अनुषंगाने तृतीयपंथींयासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबाबत आयोग आवश्यक ती कार्यवाही करेल. बैठकीत मानिनी मोहिते, डॉ. सान्वी जेठवाणी, दिशा पिंकी शेख, माया अवस्थी, माया शेख, मयूरी आवळेकर आदींनी समस्या मांडल्या, तसेच विविध सूचना केल्या.
पिढ्यांचे वास्तव्य येथे झाले आहे. कालांतराने शिक्षणाच्या निमित्ताने सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड, धनंजय चंद्रचूड व इतर कुटुंबातील सदस्य पुणे, मुंबई या ठिकाणी स्थलांतरित झाले. परंतु कनेरसर येथे आमचे चंद्रचूड कुटुंबाचे कुलदैवत नरसिंह या देवतेचे देऊळ आहे. या कुलदैवताच्या पूजा व उत्सवासाठी सर्व चंद्रचूड कुटुंब वर्षातून एकदा एकत्र येते. धनंजय हे नेहमी गावाच्या खुशालीबाबत चौकशी करत असतात.