पुढारी ऑनलाईन : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची बुधवारी (दि.9 ) जामीन मिळाला. परंतु ईडीचा या जामिनाला (ED) विरोध कायम आहे. त्यामुळे याच्या विरोधात उच्च न्यायालयात ईडीने जामिन स्थगिती याचिकेवर अपिल केले आहे.
याच याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, राऊत यांची अटक ही बेकायदेशीर आहे असे पीएमएलए कोर्टाने ईडी तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला आहे, असे कोर्टाने सुनावले आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली होती. गेले १०३ दिवस ते आर्थर रोड कारागृहात होते. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सहभाग असल्याचा आरोप केला आहे. राऊतांच्या वकिलांनी पत्राचाळ घोटाळ्याशी त्यांचा काही संबंध नाही असा युक्तीवाद केला. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
ईडीची उच्च न्यायालायात धाव
संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज ईडीने उच्च न्यायालयात केला हाोता. यावर बुधवारी ( दि. ९ ) सुनावणी झाली. या प्रश्नी दहा मिनिटांमध्ये निर्णय देणे चुकीचे ठरेल, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने संजय राऊतांच्या जामिनाला स्थगिती देण्यास नकार दिला.
या प्रकरणी गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. (Patra Chawl land scam ) मनी लाँड्रिंग प्रकरणात आज विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला होता. 'पीएमएलए' कोर्टाने खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या जामीन आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची ईडीची मागणी फेटाळली होती. यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
हेही वाचा