MP Supriya Sule : सत्यमेव जयते! संजय राऊत यांच्या जामीनावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | पुढारी

MP Supriya Sule : सत्यमेव जयते! संजय राऊत यांच्या जामीनावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या १०० दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या कोठडित आहेत. आज त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. कथित प्रत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने अटक केली होती. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर माध्यमांशी बोलताना सत्यमेव जयते अशी पहिली प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अनिल देशमुख, नवाब मल्लिक आणि संजय राऊत वेगवेगळ्या प्रकरणात अटकेत आहेत. संजय राऊतांना आज न्यायालयाने जामीन  ईडीच्या कोठडीत असणाऱ्यांनी लवकरात लवकर बाहेर यावे. पुन्हा लोकांच्यात जाऊन मायबाप जनतेची सेवा करावी, अशी अपेक्षादेखील सुळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. हे आमचे आणि देशाचे लढवय्ये नेते आहेत. प्रत्येकाच्या वाट्याला असा वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष येत असतो, त्याला प्रत्येकाने सामोरे जावे लागते. हे आमचे लढवय्ये नेते आहेत, म्हणून ते लढत आहेत. संजय राऊत हे लवकरच निर्दोश बाहेर येतील आणि पुन्हा नव्याने कामाला लागतील असेही त्या म्हणाल्या.

अजित पवार नॉटरिचेबल असल्याच्या प्रश्नावर पडदा

काही तासांपूर्वी राजकीय पटलावर विरोधी पक्षनेते अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेला ओत आला होता. यावर स्पष्टीकरण देताना प्रत्येकाला त्याचे एक पर्सनल आयुष्य असते, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या चर्चेवर पडदा टाकला. याविषयी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अजित पवार त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते नॉट रिचेबल असू शकतात. म्हणून याचा अर्थ काही राजकीय असेल असे होऊ शकत नाही. असे मत सुळे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा:

Back to top button