देशातील 10 लाख रेशन कार्डे रद्द होणार; जाणून घ्या अपात्र कार्डधारकांत कोण?

देशातील 10 लाख रेशन कार्डे रद्द होणार; जाणून घ्या अपात्र कार्डधारकांत कोण?
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : सरकारी रेशनचा अवैध लाभ घेत आहेत, अशा देशभरातील 10 लाख लोकांच्या बनावट शिधापत्रिका रद्द होणार आहेत. लवकरच या शिधापत्रिकांवरील रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. बनावट शिधापत्रिकाधारकांनी घेतलेल्या रेशनपोटी सरकारकडून वसुलीही करण्यात येणार आहे.

सध्या देशभरातील 80 कोटींहून अधिक लोक मोफत रेशनचा लाभ घेत आहेत; पण या सुविधेला पात्र नसलेले लोकही लाभ उपटत आहेत. अपात्र असताना वर्षानुवर्षे रेशन सुविधेचाही लाभ घेत आहेत. अलीकडेच सरकारने 10 लाख अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली आहे. या शिधापत्रिकाधारकांना यापुढे गहू, हरभरा आणि तांदूळ मोफत मिळणार नाही. अपात्र शिधापत्रिकाधारकांची यादी सरकारला पाठवावी, असे आदेश शिधावाटप विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. रेशन विक्रेते ही यादी तसेच संबंधित कार्डधारक अपात्र का आहे, त्याचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवतील. नंतर त्यांची कार्डे रद्द केली जातील. मोफत रेशन मिळण्यास पात्र असलेल्यांनाच रेशन मिळेल.

अपात्र कार्डधारकांत कोण?

  • जे कार्डधारक आयकर भरतात, ज्यांच्याकडे 10 बिघ्यांपेक्षा जास्त जमीन आहे, अशा लोकांची यादीही तयार केली जात आहे.
  • गेल्या चार महिन्यांत मोफत रेशन घेतलेले नाही, अशा लोकांचाही या यादीत समावेश आहे.
  • मोफत रेशन घेऊन त्याचा व्यवसाय करणार्‍यांचीही ओळख पटवण्यात आली आहे.
  • बनावट शिधापत्रिका वापरणार्‍यांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशात असल्याचे समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news