Satyendra Jain : सत्येंद्र जैन यांना दिल्लीबाहेरील तुरुंगात ठेवले जावे; केंद्रीय मंत्री लेखी यांची मागणी | पुढारी

Satyendra Jain : सत्येंद्र जैन यांना दिल्लीबाहेरील तुरुंगात ठेवले जावे; केंद्रीय मंत्री लेखी यांची मागणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना दिल्लीतील तुरुंगातून हलवून इतर राज्यातल्या तुरुंगात ठेवले जावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केली. रविवारी (दि. ६) पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी हे मत व्यक्त केले. सत्येंद्र जैन यांची मंडावली तुरुंगात बडदास्त ठेवली जात असल्याचे प्रकरण अलीकडेच उघडकीस आले होते. (Satyendra Jain)

या वेळी लेखी म्हणाल्या की, सत्येंद्र जैन यांनी तुरुंगात बसूनच खंडणी वसुलीचा उद्योग सुरु केला आहे. हवाला प्रकरणात गंभीर आरोप असलेल्या जैन यांची इतर राज्यातल्या तुरुंगात रवानगी करणे आवश्यक आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना, दिल्ली सरकार तसेच न्यायव्यवस्थेकडे आम्ही ही मागणी करीत आहोत. जैन यांच्याकडून मंत्रीपदाचा राजरोस गैरवापर सुरु आहे, असे लेखी यांनी सांगितले.

घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर यांनी नुकताच जैन यांना कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा सनसनाटी आरोप एका पत्राद्वारे केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आपण स्वतः ५० कोटी रुपये दिले होते, असेही सुकेश यांनी सांगितले होते. (Satyendra Jain)

हेही वाचा

Back to top button