Bypoll Result 2022 : पोटनिवडणुकीत भाजपची सरशी, सातपैकी चार जागांवर विजयी | पुढारी

Bypoll Result 2022 : पोटनिवडणुकीत भाजपची सरशी, सातपैकी चार जागांवर विजयी

पुढारी ऑनलाइन डेस्क : महाराष्ट्रासह, बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि ओडिसा येथील 7 जागांसाठी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज (दि.६) जाहीर झाले.  सातपैकी ४ जागांवर भाजपचा विजय झाला आहे. गोकर्णनाथ, गोपालगंज, धामनगर, आदमपूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. ( Bypoll Result 2022 )   महाराष्ट्रातील अंधेरी पूर्वमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. तर बिहारमधील मोकामा मतदारसंघात राजदच्या नीलम देवी आ‍णि तेलंगणात टीआरएसच्या कुसुकुंतला रेड्डी यांनी विजय संपादन केला.

तेलंगणात काटे की टक्कर देत टीआरएसच्या कुसुकुंतला रेड्डी विजयी

टीआरएसच्या कुसुकुंतला रेड्डी आणि भाजपचे कोमातिरेड्डी राज गोपाल रेड्डी यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. मतमोजणीत  कधी कुसुकुंतला तर कधी कोमातिरेड्डी पुढे होते. शेवटपर्यंत दोघांमध्ये काटे की ट्क्कर पाहायला मिळाली. अखेर टीआरएसच्या कुसुकुंतला रेड्डी विजयी झाल्या. भाजप नेते राज गोपाल रेड्डी यांनी पराभव स्वीकारला. त्यांनी आरोप केला आहे की, टीआरएसने अनियमितता करून विजय मिळवला. इतिहासात प्रथमच एका रिटर्निंग अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.

गोकर्णनाथ पोटनिवडणुकीत भाजप सुसाट

उत्तर प्रदेशच्या गोला गोकर्णनाथ पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अमन गिरी यांनी 1,24,810 मते घेतली. या मोठ्या विजयाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

मोकामा मतदारसंघात राजदचा डंका

बिहारमधील मोकामा मतदारसंघात बाहुबली नेते अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांनी राजदकडून निवडणूक लढवली होती. त्यांनी विजयी मिळवला.

गोपलगंज आणि धामनगरमध्ये भाजपचा झेंडा

गोपलगंज येथून भाजपच्या उमेदवार कुसुम देवी यांनी राजदचे मोहन गुप्ता यांचा जवळपास 1,794 मतांनी पराभव केला आहे. डिशाच्या धामनगर येथून भाजपचे सूर्यवंशी सूरज यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. धामनगर येथून भाजपचे सूर्यवंशी विजयी झाले.

हरियाणाच्या आदमपूर येथून भाजपचा मो‍ठा विजय

भाजपचे भव्य विष्णोई यांनी समाजवादी पार्टीचे प्रतिस्पर्धी उमेदवार विनय तिवारी यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी तिवारी  यांचा 15,740 मतांनी पराभव केला.

महाराष्ट्रात ऋतुजा लटके विजयी

महाराष्ट्रात अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला आहे. ऋतुजा या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या  पत्नी आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांकडून ही निवडणूक लढवली होती. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली होती. अन्य सात अपक्ष त्यांच्या विरोधात रिंगणात होते. ऋतुजा लटके सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या. त्यांचा ६६ हजार ५६० इतक्या मतांनी  विजय झाला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button