Cyrus Mistry’s Death : सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी डॉ. अनाहिता पंडोलवर गुन्हा दाखल | पुढारी

Cyrus Mistry's Death : सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी डॉ. अनाहिता पंडोलवर गुन्हा दाखल

मुंबई; पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. सायरस मिस्त्री यांचे ४ सप्टेंबर रोजी एका कार अपघातात निधन झाले होते. आता या प्रकरणी पालघरमधील कासा पोलिसांनी शनिवारी (दि.५) कार चालवणाऱ्या डॉ.अनाहिता पांडोल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघाताच्या वेळी अनाहिता याच कार चालवत होत्या. अनाहिता पडोल यांच्या विरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे, मानवी जीव धोक्यात घालणे आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cyrus Mistry’s Death)

सायरस मिस्त्री यांचा अपघातात झाला मृत्यू (Cyrus Mistry’s Death)

दिवंगत भारतीय उद्योगपती दिवंगत शापूरजी पालोनजी मिस्त्री यांचा धाकटा मुलगा सायरस मिस्त्री यांनी अल्पावधीतच आपल्या क्षमतेच्या बळावर मोठी उंची गाठली होती. त्यांच्या जाण्यानंतर गाड्यांच्या सुरक्षेवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अपघाताच्या वेळी ते मागे बसले होते आणि त्याने सीट बेल्ट लावले नव्हते. या अपघातानंतर आता मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात यावे, यावरही भर देण्यात आला आहे..

मर्सिडीजने डिव्हायडरला धडक दिली होती

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात सायरस मिस्त्री यांची कार दुभाजकाला धडकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला मर्सिडीज कारने जात होते. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात असताना दुपारी 3.15 च्या सुमारास हा अपघात झाला होता. सूर्या नदिवरील पुलावर हा अपघात झाला होता. (Cyrus Mistry’s Death)

अनाहिता पंडोल चालवत होत्या वाहन

सायरस मिस्त्री यांच्यासोबत जहांगीर दिनशॉ पंडोल, डॉ. अनाहिता पंडोल आणि दारियस पंडोल कारमध्ये होते. यापैकी सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचे निधन झाले. उर्वरित दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताच्या वेळी अनाहिता पंडोल कार चालवत होत्या. अनाहिता पंडोल या स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्या दारियस पंडोल यांच्या पत्नी आहेत. त्या अद्याप रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button