Gujarat Morbi Bridge Incident : गुजरात पूल दुर्घटना! ओरेवा कंपनीला मंजूर २ कोटी, खर्च फक्त १२ लाख | पुढारी

Gujarat Morbi Bridge Incident : गुजरात पूल दुर्घटना! ओरेवा कंपनीला मंजूर २ कोटी, खर्च फक्त १२ लाख

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातच्या मोरबीमधील झुलता पूल कोसळल्याप्रकरणी सुरु असलेल्या तपासादरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुलाच्या नुतनीकरणासाठी देण्यात आलेल्या २ कोटी रुपयांपैकी केवळ १२ लाख रुपयेच खर्च झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अहमदाबाद या ठिकाणी असलेल्या ओरेवा ग्रुप या दुर्घटनेतील पुलाच्या नुतनीकरणाचा किंवा दुरुस्तीचा प्रकल्प घेतलेला होता. ओरेवा ग्रुप अजिंठा या कंपनीची उपकंपनी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुलाच्या नुतनीकरणासाठी वाटप केलेल्या एकूण रकमेपैकी केवळ ६ % या प्रकल्पासाठी खर्च झाला आहे. (Gujarat Morbi Bridge Incident)

ओरेवा ग्रुपने मार्चमध्ये पुलाच्या दुरूस्तीशी संबंधित कंत्राट घेतले होते. ओरेवा ग्रुपचे अध्यक्ष जयसुख पटेल यांनी २४ ऑक्टोबर रोजी गुजराती नववर्षाला पूल पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. या अपघातात 140 जणांचा मृत्यू झाला होता. (Gujarat Morbi Bridge Incident)

१५ वर्षांसाठी मार्चमध्ये दिले होते कंत्राट

मोरबी महानगरपालिका आणि ओरेवा ग्रुपची मूळ कंपनी अजंठा मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात मार्च 2022 मध्ये करार झाला. यामध्ये १५ वर्षांच्या देखभालीचा करार करण्यात आला होता. या कराराची २०३७ पर्यंत मुदत ठेवण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरातच्या अधिकाऱ्यांची परवानगी नसताना देखील अवघ्या सात महिन्यांतच हा पूल खुला करण्यात आलेला होता. तसेच मोरबीच्या महानगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीपसिंग जाला यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button