NET Exam 2022 : प्रतीक्षा संपली! नेट परीक्षेचा निकाल उद्या | पुढारी

NET Exam 2022 : प्रतीक्षा संपली! नेट परीक्षेचा निकाल उद्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : यूजीसी नेट परीक्षा २०२२ (NET Exam 2022) चा निकाल उद्या (५ नोव्हेंबर) जाहीर होणार. याबाबत अधिकृत माहिती यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी आज सकाळी ट्विट करत दिली आहे. परीक्षेस बसलेले विद्यार्थी त्यांचा निकाल UGC NET ची अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन पाहू शकतात. ही परीक्षा देशभरात चार टप्प्यात झाली होती. यूजीसी नेट 2022 परीक्षेचा निकाल ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर ऑनलाइन उपलब्ध होईल. विद्यार्थी त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख यांची नोंद करून निकाल बघू शकतील.

यूजीसीने नेट परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केल्यानंतर विद्यार्थांना निकालाची उत्सुकता लागली असेल. (NET Exam 2022) पण तुम्हाला जास्त दिवस उत्सुकता करावी लागणार नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) निकालाची तारीख जाहीर केली आहे. अधिकृत माहिती यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी आज सकाळी ट्विट करत दिली आहे. युजीसी नेट निकाल २०२२ पाच नोव्हेंबर रोजी लागणार आहे. हा निकाल डिसेंबर 2021 आणि जून 2022 सत्रांसाठी जाहीर केला जाईल. डिसेंबर २०२१ मध्ये नेट परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ या दोन्ही सत्रांची एकच सामायिक परीक्षा घेण्याचा निर्णय ‘एनटीए’कडून घेण्यात आला होता.

असा पाहा UGC NET 2022 निकाल 

1. प्रथम UGC NET ची अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा. 

2. ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर गेल्यानंतर UGC NET December 2021 and June 2022 Result वर क्लिक करा.

3. क्लिक केल्यानंतर तुमच्या अॅप्लीकेशन नंबर आणि जन्मतारीख यांची नोंद करा 

4. त्यानंतर स्क्रिनवर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल

5. त्यानंतर तुम्ही तुमचा निकाल डाउनलोड करु शकता

 

हेही वाचा

 

Back to top button