Tata Group : टाटा ग्रुप ४५ हजार महिलांची नोकरभरती करण्याच्या तयारीत! होसुर प्लांटमध्ये भरती | पुढारी

Tata Group : टाटा ग्रुप ४५ हजार महिलांची नोकरभरती करण्याच्या तयारीत! होसुर प्लांटमध्ये भरती

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाटा ग्रुप (Tata Group) सध्या नव्या नोकरींशी संबंधित मोठी बातमी देणार आहे. टाटा ग्रुप तमिळनाडूतील होसुर प्लांट मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. टाटा ग्रुप त्यांच्या या प्लांटमध्ये येत्या दीड-दोन वर्षांमध्ये जवळपास ४५ हजार महिलांची नोकर भरती करणार आहे. होसुर प्लांट मध्ये आयफोनचे (iPhone) उत्पादन केले जाते. एका अहवालानुसार या कारखान्यामध्ये सध्या १०००० कर्मचारी आहेत. पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त आहे. नव्या नोकरभरती केल्यानंतर महिलांची संख्या ५५००० होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अॅपल कंपनीच्या उत्पादनाच्या पुरवठ्यासाठी फक्त चीन हे एकच केंद्र नसेल. अमेरिकेमधील टेक्नॉलॉजीतील दिग्गज कंपन्या चीनच्या बाहेर उत्पादन करण्याचा विचार करत आहे. टाटा ग्रुप (Tata Group) या संधीचा फायदा उठविण्याचा विचार करत आहेत. टाटा ग्रुप भारतात आयफोनच्या उत्पादनाचे मोठे युनिट बनवण्याच्या तयारीत आहे. एका अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे की, अॅपलकडून मोठे काम मिळवून जास्तीत जास्त उत्पादन आपल्या कंपनीमध्ये करण्याचा विचार टाटा ग्रुप करत आहे. तमिळनाडूतील होसुर प्लांट मध्ये जवळपास ४५ हजार महिलांची नोकर भरती करण्याचा आराखडा बनवण्यात येत आहे. त्यांच्या या नव्या आराखड्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ५५००० हजार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी, जवळपास 80 टक्के आयफोन भारतात बनवले जातात. आयफोन हा जागतिक उत्पादनाचा एक भाग आहे. अहवालानुसार, चीनच्या कोविड काळातील लॉकडाऊन आणि अमेरिकेसोबतच्या राजकीय तणावाचा सामना केल्याच्या पार्शंवभूमीचा विचार करत भारतात देशांतर्गत आयफोनचे उत्पादन वाढवण्याचा मागणी होऊ लागली. भारतात जवळपास 200 मोबाईल कंपन्यांचे उत्पादन होते. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी (सॅमसंग) देखील भारतात आहे. देशात मोबाईलचे उत्पादन होत असले तरी बहुतांश भाग आणि कच्चा माल चीन किंवा तैवानमधून आयात केला जातो.

हेही वाचा

Back to top button