बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये मदतनिधी; दिल्ली सरकारची घोषणा | पुढारी

बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये मदतनिधी; दिल्ली सरकारची घोषणा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांना पाच हजार रुपयांची मदत द्यावी, असे निर्देश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कामगार खात्याचे मंत्री मनिष सिसोदिया यांना दिले आहेत.

मागील काही काळापासून दिल्लीची प्रदूषण स्थिती खराब बनलेली आहे. त्यामुळे गेल्या शनिवारी हवा गुणवत्ता समितीने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील बांधकामे तसेच इमारतींच्या तोडकामांवर बंदी घातली होती. या निर्बंधातून अत्यावश्यक कामे तसेच जीआरएपी – ३ श्रेणीतील कामे वगळण्यात आली होती. बांधकामे आणि तोडकामांमुळे बेकार झालेल्या कामगारांना पाच हजार रुपयांची मदत द्यावी, असे केजरीवाल यांनी सिसोदिया यांना पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button