Morbi Bridge Collapse : मोरबी न्यायालयाकडून 4 आरोपींना 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी | पुढारी

Morbi Bridge Collapse : मोरबी न्यायालयाकडून 4 आरोपींना 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुढारी ऑनलाइन डेस्क : मोरबी कोर्टाने #MorbiBridgeCollapse मधील 4 आरोपींना शनिवार दि. 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर आणखी 5 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिस कोठडीत असलेल्या 4 जणांपैकी 2 ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक आहेत आणि इतर 2 हे फॅब्रिकेशन कामाच्या ठेकेदाराचे लोक आहेत.

गुजरातमधील मोरबी येथे पूल कोसळल्याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ओरेवा कंपनीचे दोन व्यवस्थापक, दोन तिकीट लिपिकांसह दोन कंत्राटदार आणि तीन सुरक्षारक्षकांचा समावेश आहे.

Morbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील ‘केबल ब्रिज’ रविवारी सायंकाळी 6.30 वाजता अचानक तुटून दुर्घटना घडली. घटनेत एकूण 133 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. मृतामध्ये भाजपचे खासदार मोहन कुंदारिया यांच्या कु़टुंबातील १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पूल तुटताच पुलावरील बहुतांश जण नदीत पडले. दुर्घटना घडली तेव्हा पुलावर 500 पेक्षा जास्त लोक असल्याचे सांगण्यात येते. या घटनेने मोरबीत एकच धावपळ उडाली. पोलिसांनी तसेच प्रशासनाने तत्काळ बचाव मोहीम सुरू केली. शक्य तितक्या लोकांना नदीतून बाहेर काढले. पुलाची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती व तो पूर्ववत सुरू करण्यात आला होता. तत्पूर्वी, 6 महिने तो पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.

Morbi Bridge Collapse : गुजरातमधील या ‘केबल ब्रिज’ चे काम करणाऱ्या एजन्सीविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती मोरबी विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाशभाई देकावडिया यांनी दिली आहे. या एजन्सीविरूद्ध भारतीय दंड संहितेतील कमल ३०४, कलम ३०८ आणि कलम ११४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Morbi Bridge Collapse : पुलाचा इतिहास

मोरबीचे तत्कालीन राजे प्रजावत्सल सर वाघजी ठाकोर हे राजमहालातून दरबारापर्यंत या पुलाने जात असत. त्यांच्या काळातच पुलाची निर्मिती झाली. राजेशाही संपुष्टात आल्यानंतर मोरबी नगरपालिकेवर या पुलाची जबाबदारी सोपविण्यात आली. लाकूड आणि तारेने बनविण्यात आलेला हा पूल 233 मीटर लांब आणि 4.6 फूट रुंद आहे. हा पूल एक पर्यटनस्थळ होते. त्यासाठी 15 रुपये तिकिट दरही आकारला जात असे. 1880 मध्ये 3 लाख 50 हजार रुपये खर्चून हा पूल बनविण्यात आला होता. पुलासाठीचे साहित्य तेव्हा ब्रिटनमधून मागविण्यात आले होते.

हे ही वाचा :

Gujarat Morbi Bridge: गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेत भाजप खासदाराच्या कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू 

Morbi Bridge Accident : गुजरात ‘केबल ब्रिज’ दुर्घटनेत १३२ जणांचा मृत्यू- गृहमंत्री हर्ष संघवी

Back to top button