मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : अरविंद केजरीवाल

file photo
file photo
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मोरबी येथील पूल दुर्घटनेप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केली. राज्यात ताबडतोब विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाव्यात, असेही केजरीवाल म्हणाले.
दिल्लीत आप सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रत्येक चांगल्या कामाला भाजपवाले रोखू पाहत आहेत. भाजपचे पुढचे लक्ष्य 'मोहल्ला क्लीनिक' हे आहे. भाजपचे लोक सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. या लोकांनी कट रचून दिल्लीत सुरु असलेल्या योगशाळा बंद केल्या आहेत. योगशाळेच्या शिक्षकांसाठी भले भीक मागावी लागेल, पण मी योगशाळा बंद होऊ देणार नाही. दिल्लीतील सर्व रुग्णालये अत्याधुनिक करण्यात आली आहेत. उपराज्यपालांच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. दिल्लीची जनता या लोकांना सडेतोड उत्तर देईल. असे केजरीवाल म्‍हणाले.
हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news