एलियन्सबाबत शास्त्रज्ञाने केला 'हा' अजब दावा | पुढारी

एलियन्सबाबत शास्त्रज्ञाने केला 'हा' अजब दावा

हॉर्वर्ड : जगातील शास्त्रज्ञ एलियन्ससंदर्भात सातत्याने काही ना काही आर्श्चकारक दावे करत असतात. कोण म्हणतो एलियन्स अस्तित्वात आहेत, तर कोण म्हणतात ते अस्तित्वातच नाही. काही वेळा तर लोकांनी एलियन्सचे ‘यूएफओ’ पाहिल्याचा दावा केला आहे. मात्र, आजपर्यंत एलियन्ससंदर्भात कोणालाच ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, आता हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका प्रोफेसरने असा एक दावा केला आहे की, त्यामुळे लोक आश्चर्यचकित बनले आहेत.

हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीचे ए. व्ही. लोएब यांनी असा दावा केला आहे की, ओमुमुआ नामक लघुग्रह हा एक महकाय खडक असला तरी ते एलिन्सचे स्पेसशिपच आहे. तसे पाहिल्यास हे एकच स्पेसशिप नसून सूर्यमालेत ते मोठ्या संख्येने आहेत. दरम्यान 2018 मध्ये लोएब व त्यांच्या सहकार्‍याने म्हटले होते की, ‘ओमुमुआ’ हा एक मोठा खडक असला तरी तो एलियन सभत्येने तयार केला असून तो आता अंतराळात फिरत आहे.

ज्यावेळी ओमुमुआ नजरेस पडला त्यावेळी त्याची रचना आश्चर्यचकित करणारीच होती. कारण त्याच्या पाठीमागे वायूच्या शेपटीसारखे काहीच नव्हते. अशी शेपटू कधी कधी लघुग्रह अथवा धुमकेतू यांना दिसून येते. याचा आधार घेऊनच लोएब यांनी हा लघुग्रह म्हणजे एलियन्सचे स्पेसशिप असू शकते, असा दावा केला होता. अन्य काही शास्त्रज्ञांनी हा दावा खोडून काढला. मात्र, लोएब आपल्या दाव्यावर ठाम राहिले. तसेच त्यांनी अवकाशात एलियन्सची तब्बल चार हजार खर्वपेक्षाही जास्त एलियन्सची स्पेसशिप असल्याचेही म्हटले. मात्र, यास कसलाच ठोस आधार नाही.

Back to top button