तयार रहा! 4 कंपन्यांच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, जाणून घ्या… | पुढारी

तयार रहा! 4 कंपन्यांच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, जाणून घ्या...

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2022 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी आतापर्यंत चांगले राहिले नसल्याचे चित्र आहे. याला कारणे ही तशीच आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने जागतिक अर्थव्यवस्था हादरली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत फारच मर्यादित कंपन्यांनी त्यांचे IPO आणले होते. पण या आठवड्यात गुंतवणूकदारांना IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 4 मोठ्या संधी मिळतील. DCX सिस्टम्स, बिकाजी, फ्यूजन मायक्रो फायनान्स आणि ग्लोबल हेल्थचे आयपीओ (IPO) 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत खुले असतील. या चार कंपन्या मिळून 4,500 कोटी रुपये प्रायमरी मार्केटमधून उभारण्याचा प्रयत्न करतील. या 4 कंपन्यांच्या IPO शी संबंधित सर्व लहान-मोठ्या गोष्टी जाणून घेऊया…

1. DCX IPO प्राइस बँड (DCX IPO Price Band)

DCX Systems या केबल आणि वायर असेंबलिंग कंपनीचा IPO सोमवार, 31 ऑक्टोबरपासून मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. कंपनीचा आयपीओ 2 नोव्हेंबर 2022 पर्यंत खुला असेल. DCX Systems ने इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यू (Fresh Issue)चा आकार 500 कोटी रुपयांवरून 400 कोटी रुपयांपर्यंत कमी केला आहे. फ्रेश इश्यू व्यतिरिक्त, IPO मध्ये प्रवर्तकांकडून 100 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. कंपनीच्या आयपीओची किंमत 197 ते 207 रुपये आहे.

2. फ्यूजन मायक्रोफायनान्स IPO प्राइस बँड (Fusion Microfinance IPO Price Band)

जागतिक खाजगी इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकस-समर्थित फ्यूजन मायक्रोफायनान्सने त्याच्या 1,104 कोटी रुपयांच्या IPO साठी प्रति शेअर 350-368 रुपये किंमत श्रेणी निश्चित केली आहे. कंपनीने शुक्रवारी (दि. 28) ही माहिती दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्रायमरी शेअर विक्री सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी 2 नोव्हेंबर रोजी खुले तर 4 नोव्हेंबर रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदार 1 नोव्हेंबर रोजी शेअर्ससाठी बोली लावू शकतील. IPO मध्ये 600 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक 1,36,95,466 समभागांच्या विक्रीसाठी (OFS) ऑफर देतील. कंपनीला न्यू इश्यू (New Issue)मधून 1,104 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे.

3- ग्लोबल हेल्थ IPO प्राइस बँड (Global Health IPO Price Band)

ग्लोबल हेल्थ लिमिटेड, जे मेदांता ब्रँड अंतर्गत रुग्णालये चालवते आणि व्यवस्थापित करते, त्यांच्या 2,206 कोटी IPO साठी प्रति शेअर 319-336 रुपये किंमत निश्चित करण्यात आली. कंपनीची प्रायमरी शेअर विक्री 3 ते 7 नोव्हेंबर दरम्यान सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी खुले केले जातील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली 2 नोव्हेंबर रोजी कुले होईल. IPO मध्ये 500 कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, त्यात 5.08 कोटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे.

4- बिकाजी फूड्स IPO प्राइस बँड (Bikaji IPO Price Band)

बिकाजीचा आयपीओही पुढील आठवड्यात खुला होऊ शकतो. बँकर्सच्या मते, कंपनी या IPO द्वारे 900 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. विद्यमान भागधारक आणि प्रवर्तक 29.37 समभागांची ऑफर आणतील. बिकाजीचा IPO 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान खुला होईल. तथापि, कंपनीने अद्याप IPO साठी प्रति शेअर किंमत निश्चित केलेली नाही.

2021 च्या तुलनेत 2022 मध्ये प्रायमरी बाजारात शांतता

2021 च्या तुलनेत 2022 हे वर्ष गुंतवणूकीच्या दृष्टीने अतिशय शांततेत गेले आहे. पहिल्या तीन महिन्यांत केवळ तीन कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल झाले होते. मात्र मार्चनंतर 19 कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले. या वर्षी आतापर्यंत कंपन्यांनी आयपीओद्वारे 44,085 कोटी रुपये उभे केले आहेत. तर 2021 मध्ये 63 कंपन्यांनी IPO द्वारे 1.19 लाख कोटी रुपये उभे केले होते. रशिया-युक्रेन युद्ध आणि वाढत्या महागाईने कंपन्यांना त्यांच्या योजनांपासून मागे हटण्यास भाग पाडले आहे.

Back to top button