African Swine Flu : केरळमध्ये डुक्करांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची बाधा; बाधित डुक्करांना ठार मारणार | पुढारी

African Swine Flu : केरळमध्ये डुक्करांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची बाधा; बाधित डुक्करांना ठार मारणार

पुढारी ऑनलाई डेस्क : केरळमधील कोट्टयाम जिल्ह्यातील एक फार्ममध्ये डुक्करांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सर्व बाधित डुक्करांना ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठार मारल्यानंतर सर्व डुक्करांना याच फार्ममध्ये सुरक्षितरीत्या पुरण्यात येणार आहे. जवळपास ४८ डुक्करांत हा आजार दिसून आला आहे. (African Swine Flu)

आजार दिसून आलेल्या फार्मपासून १ किलोमीटर त्रिजेचा परिसर बाधित म्हणून घोषित करण्यात आला असून या भागात कडक निगराणी ठेवण्यात आली आहे. हा आजार इतर प्राण्यात पसरू नये, यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. (African Swine Flu)

हा आजार काही महिन्यांपूर्वी वायनाड आणि कोन्नूर या जिल्ह्यांत दिसून आला होता. हा आजार अत्यंत वेगाने फैलवतो. त्यामुळे प्राण्यांत ब्रेमहॅमरेज होऊन मृत्यू ओढवतो. पाळीव तसेच जंगली डुक्करांना हा आजार होतो. (African Swine Flu)

या आजारावर कोणतेही औषध नाही, त्यामुळे बाधित डुक्करांना ठार मारून, पुरण्याशिवाय दुसरा उपाय नाही.

पण या आजाराचा माणसांना कोणताही धोका नाही कारण हा आजार प्राण्यांतून माणसांत फैलावू शकत नाही.

अधिक वाचा :

Back to top button