GM Mustard : 'जीएम मोहरी'च्या लागवडीला परवानगी देऊ नये; स्वदेशी जागरण मंचची केंद्र सरकारकडे मागणी | पुढारी

GM Mustard : 'जीएम मोहरी'च्या लागवडीला परवानगी देऊ नये; स्वदेशी जागरण मंचची केंद्र सरकारकडे मागणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जेनेटिकली मोडिफाईड (जीएम) मोहरीच्या लागवडीस परवानगी देऊ नये, अशी मागणी स्वदेशी जागरण मंचने केंद्र सरकारकडे केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारतीय किसान संघाने याआधीच जीएम मोहरीच्या व्यावसायिक वापराला परवानगी देण्यास विरोध केलेला आहे. (GM Mustard)

केंद्र सरकारच्या अखत्यारितील जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी बेफिकीरपणे काम करीत असून या कमिटीने अलीकडेच जीएम मोहरीच्या लागवडीस परवानगी दिली आहे. वास्तविक जीएम मोहरीच्या लागवडीस कधीच परवानगी देता कामा नये, असे स्वदेशी जागरण मंचने वन आणि पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. (GM Mustard)

१८ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटीने जीएम मोहरीच्या व्यावसायिक लागवडीस परवानगी दिली होती. जीएम मोहरीसंदर्भातील सुरक्षितता तसेच तिचा प्रभावीपणा याबाबत विचारलेल्या प्रश्नांना कमिटीने उत्तर दिलेले नाही. अशा स्थितीत आता थेट जीएम मोहरीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. ही अत्यंत दुर्दैवाची बाब असल्याचे स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय सह समन्वयक डॉ. अश्विनी महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा;

Back to top button