Khajrana Ganesh Mandir : इंदौरमधील खजराना गणेश मंदिर परिसरातील दुकानाची तब्‍बल १.७ कोटी रुपयांना विक्री | पुढारी

Khajrana Ganesh Mandir : इंदौरमधील खजराना गणेश मंदिर परिसरातील दुकानाची तब्‍बल १.७ कोटी रुपयांना विक्री

पुढरी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेशमधील इंदौर येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेला खजराना गणेश मंदिर परिसरातील एक पुजेचे साहित्‍य विक्री करणार्‍या दुकानाची तब्‍बल सहापट अधिक रक्‍कमेने विक्री झाली आहे. इंदौर विकास प्राधिकरणाने या दुकानाची किंमत ३० लाख रुपये निश्‍चित केली होती. ( Khajrana Ganesh Mandir ) मात्र लिलावात ६४ चौरस फूट असणार्‍या दुकानाची तब्‍बल १.७ कोटी रुपयांना विक्री झाली असून, बोली लावणार्‍याने एका चौरस फूटासाठी तब्‍बल २.६८ लाख रुपये मोजले आहेत.

श्री खजराना गणेश मंदिर परिसरातील ए-१ क्रमांकाचे पूजेचे साहित्‍य विक्री दुकान 30 वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्‍यासाठी लिलाव जाहीर करण्‍यात आला होता. या मंदिरातील दुकान गाळ्याच्‍या विक्रीसाठी इंदौर विकास प्राधिकरणाने ( आयडीए ) लिलावाची घोषणा केली होती. या लिलावाबाबत माहिती देताना इंदौर विकास प्राधिकरणाचे ( आयडीए ) मुख्‍य कार्यकारी अधिकार राम प्रकाश अहिरवार म्‍हणाले की, या दुकानाची मूळ किंमत ३० लाख रुपये होती. यासाठी 40 लाख रु. 60.8 लाख रु. 91.1 लाख , रु. 1.1 कोटी रु. 1.61 कोटी आणि सर्वाधिक बोली. 1.72 कोटी रुपये बोली लागली होती.

Khajrana Ganesh Mandir : तुम्‍ही चुकून बोली लावली का ?…

देवेंद्र राठोड यांनी सर्वाधिक १.७२ कोटी रुपयांची बोली लावली. तुम्‍ही चुकून बोली लावली होती का, अशी विचारणा अहिरवार यांनी राठोड यांना केली.तसेच देशाताील कोणत्‍याही व्‍यावसायिक मालमत्तेसाठी प्रति चौरस फूटसाठी हा आतापर्यंतचा सर्वोच्‍च दर असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. राठोड यांनी आपण योग्‍य तीच बोली लावल्‍याचे सांगितले. आता त्‍यांना ही रक्‍कम जमा करण्‍यासाठी एक महिन्‍याची मुदत देण्‍यात आली आहे.

भाडेतत्त्‍वाच्‍या अटीनुसार हे दुकान ३० वर्षांच्‍या करारावर भाडेपट्‍टीने देण्‍यात आले आहे. फुले, प्रसाद आणि पुजेच्‍या अन्‍य साहित्‍यांची विक्री या दुकानातून होणार आहे. भाविकांचे श्रद्‍धस्‍थान असलेल्‍या या गणेश मंदिराला दररोज हजारो भाविक भेट देतात.

हेही वाचा :

Back to top button