New Delhi Lift Crash : लिफ्ट क्रॅश होऊन 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, तर 7 वर्षाचा मुलगा बचावला | पुढारी

New Delhi Lift Crash : लिफ्ट क्रॅश होऊन 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, तर 7 वर्षाचा मुलगा बचावला

पुढार ऑनलाइन डेस्क : New Delhi Lift Crash : दक्षिण दिल्लीतील कालिंदी कुंज येथे बुधवारी तिस-या मजल्यावरून लिफ्ट कोसळून एका 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा सात वर्षीय मुलग अपघातातून चमत्कारिकपणे बचावला आहे. मात्र, मुलाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. नवाब शाह, असे मयताचे नाव असून तो आपल्या कुटुंबासह त्या बिल्डिंगमध्ये राहत होता. तो व्यवसायाने बिल्डर होता. तर फरहान शाह असे अपघातात बचावलेल्या सात वर्षीय मुलाचे नाव आहे.

New Delhi Lift Crash : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नवाब शाह हा गेल्या वर्षभारापासून त्या बिल्डिंगमध्ये राहतो. बुधवारी सकाळी तो आपल्या सात वर्षाच्या मुलासोबत काही कामानिमित्त बाहेर पडला. त्याने तिस-या फ्लोअरवरून लिफ्ट घेतली. लिफ्ट सुरू झाल्यानंतर काही सेकंदातच ती खाली कोसळली. घटना घडत असताना मोठा आवाज झाल्याने बाकीचे रहिवाशांनी धाव घेतली. त्यांनी लिफ्ट कोसळल्याचे पाहिले. जिथे शाह आणि त्यांचा मुलगा जखमी अवस्थेत पडले होते. त्यांनी तातडीने त्यांना घेऊन रुग्णालयात धाव घेतली. नंतर रुग्णालय प्रशासनाने दुपारी 12 वाजता पोलिसांना घटनेची माहिती दिली.

New Delhi Lift Crash : माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. शाह यांच्या दोन्ही पाय फॅक्चर झाले होते. घटनेती गंभीर जखमी झाल्याने सायंकाळी 5 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटना घडलेल्या बिल्डिंगचे निरीक्षण केले. त्यांच्या माहितीनुसार, या बिल्डिंगचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी झाले असून ही चार मजली बिल्डिंग आहे. चौकशीत असे निदर्शनास आले की इमारतीचे बांधकाम योग्य प्रकारे झालेले नाही. तसेच लिफ्ट योग्य प्रकारे मेन्टेन देखिल केली जात नव्हती. लिफ्टची वायर तुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी सुरुवातीला आयपीसीच्या कलम 287 (यंत्रसामग्रीच्या संदर्भात निष्काळजी वर्तन) आणि 337 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या कृतीमुळे दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला. मृत्यूनंतर कलम ३०४ ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) देखील जोडण्यात आले. इमारत बांधणाऱ्या आणि लिफ्ट बसवणाऱ्या बिल्डरचा अद्याप शोध लागलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

New Delhi Lift Crash : “आम्ही आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकत आहोत. इमारतीचा मालक कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही इमारतीची कागदपत्रे देखील तपासू,” अधिकारी म्हणाला. निकृष्ट देखभाल आणि मालकाकडून निष्काळजीपणाचा आरोपही रहिवाशांनी केला.

हे ही वाचा :

सोलापूर : ऊसदर आंदोलनाचा भडका; आंदोलकांनी ट्रॅक्टरच्या १२ टायरी फोडल्या

Breaking News : भोपाळमध्ये गॅस गळतीमुळे खळबळ, एका महिलेसह तिघे रुग्णालयात दाखल

Back to top button