

पुढारी ऑनलाईन – गुजरात येथील गांधीनगरमधील एका सोसायटीत सुकाण्यासाठी घातलेली साडी शेजाऱ्याच्या बाल्कनीत गेल्याने शेजाऱ्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या ज्या महिलेची ही साडी होती, तिचे नाक शेजाऱ्याने बुक्की मारल्याने तुटले. हा प्रकार येथील हरीदर्शन सोसायटीत घडला. (man breaks womans nose)
जखमी महिलेचे नाव इंदू यादव (वय ३६) असे आहे. यादव, तिचा पती दिनानाथ आणि मुलगी असे तिघे या सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये राहातात. त्यांच्या शेजारी संजय प्रसाद राहातात. सोमवारी दुपारी संजय प्रसाद यांच्या बायकोने इंदू यांना हाक मारून सांगितले की त्यांची साडी त्यांच्या फ्लॅटच्या बाल्कनीत उडून आली आहे.
ती साडी घेण्यासाठी प्रसाद यांच्या घरी गेली असता प्रसाद यांनी तिच्याशी भांडण काढले. या महिलने जाणिवपूर्वक साडी जाणीवपूर्वक घरात टाकली असा प्रसाद यांचा आरोप होता. तर ही साडी सुकण्यासाठी घातली होती आणि ती वाऱ्याने उडून शेजाऱ्याच्या घरात गेली, असे ही महिला सांगत होती.
या भांडणात संजय यांची बाजू घेत नातेवाईक शैलेश प्रसादही या महिलेशी भांडू लागला. संजयने चेहऱ्यावर बुक्की मारल्याने या महिलेचे नाक तुटले. महिलेचा आवाज ऐकून तिचा पती धावून आला आणि हे भांडण थांबले. या प्रकरणात कलोल तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
हेही वाचा