सावधान! फटाके फोडल्यास होणार दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा | पुढारी

सावधान! फटाके फोडल्यास होणार दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा

पुढारी ऑनलाईन : दिवाळी हा भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण आहे. वर्षानुवर्षे लोक या निमित्ताने फटाके उडवत आहेत. मात्र वाढते प्रदूषण आणि खालावत चाललेली हवेची गुणवत्ता पाहता काही राज्यांनी यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर फटाके फोडण्यास बंदी घातली आहे.

निष्काळजीपणाने लावलेतले रंगीबेरंगी दिवे आणि फटाक्यांच्या स्फोटांमूळे दरवर्षी लाखो लोक जखमी होतात. शिवाय फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे फटाक्यांबाबत विविध राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आलेले आहेत.

फटाक्यांची बंदी उठवण्यासाठीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सण साजरा करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही तुमचे पैसे फटाक्यांऐवजी मिठाईवर खर्च करा, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

फटाक्यांबाबत हे आहेत नियम 

राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा , पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी राज्यात वाढते वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क आहे. दिल्ली सरकारने राजधानीत फटाके फोडणे आणि खरेदी करण्याबाबत नवीन नियम जारी केले आहेत. पर्यावरण मंत्री यावर म्हणाले की, दिल्लीत फटाके खरेदी केल्यास आणि वाजवल्यास 200 रुपये दंड आणि 6 महिने तुरुंगवास होऊ शकतो.

तसेच फटाक्यांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांना तीन वर्षांचा कारावास आणि 5 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल, असे ते म्हणाले.

पंजाब सरकारची दिवाळी आणि गुरुपूरबला फटाके वाजवण्यावर बंदी

पंजाब सरकारने राज्यात प्रदूषणाची पातळी वाढू नये म्हणून दिवाळी आणि गुरुपूरबला फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे. परंतु केवळ दिवाळी आणि गुरुपूरबलाच हिरवे फटाके वाजवण्याची परवानगी सरकारकडून देण्यात अली आहे. तसेच रात्री ८ ते १० या वेळेत हिरवे फटाके फोडता येतात.

हरियाणामध्ये फटाक्यांशिवाय होणार दिवाळी

हरियाणामध्ये यावेळी फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यात फटाके बनवणे, विक्री करणे आणि फोडणे यावर बंदी घातली आहे. नवीन आदेश येईपर्यंत ही बंदी कायम असणार आहे.  तर सरकारने हिरवे फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे.

फटाके उद्योगाला मोठा फटका

दिवाळीच्या मुहूर्तावर फटाक्यांवर घातलेल्या निर्बंधामुळे फटाके व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. फटाक्यांचे केंद्र असणाऱ्या तमिळनाडूच्या शिवकाशीमध्ये दरवर्षी ६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. परंतु गेल्या २ वर्षात कोरोना आणि आता सरकारच्या निर्बंधांमुळे फटाके उद्योगाला चांगलाच फटका बसला आहे.

हेही वाचा

आता साहेबांनी बाहेर कुठंही न जाता जागेवर बसून रिमोट फिरवावा; शरद पवार म्हणाले, ‘मी काय म्हातारा झालोय का?’ 

राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांना हटवा: ‘आप’ची केंद्रीय गृहमंत्र्यांसह केंद्रीय सर्तकता आयोगाकडे तक्रार 

ब्रिटन पंतप्रधानपदी सुनक यांच्या निवडीची औपचारिकता बाकी, जॉन्सन यांची माघार

Back to top button