Ayodhya Deepotsav : पंतप्रधान मोदींच्या उपस्थिती उजळणार १५ लाख दिवे; रविवारी होणार जागतिक रेकॉर्ड | पुढारी

Ayodhya Deepotsav : पंतप्रधान मोदींच्या उपस्थिती उजळणार १५ लाख दिवे; रविवारी होणार जागतिक रेकॉर्ड

Ayodhya Deepotsav : पंतप्रधान मोदींच्या उपस्थिती उजळणार १५ लाख दिवे

अयोध्या, पुढारी ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी अयोध्येत आयोजित दीपोत्सवला उपस्थित राहात आहेत. या वर्षी या दीपोत्सवात १५ लाख मातीचे दिवे प्रज्वलित होणार आहे. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. अयोध्येती हा सहावा दीपोत्सव आहे. (Ayodhya Deepotsav)

अयोध्येत यावेळी दीपोत्सवानिमित्त पाच यांत्रिक देखावे, ११ रामलीला, म्युझिक लेजर शो, थ्रीडी होलग्राफिक शो यांचे आयोजन करण्यात आले आहे.

संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान रामलल्ला विराजमान येथे दर्शन घेतील. त्यानंतर ते रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रची पाहाणी करतील. त्यानंतर श्री राम राज्याभिषेक, शरयू येथील आरतीला उपस्थिती आणि त्यानंतर दीपोत्सव समारंभाचा प्रारंभ असा पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने २०१७पासून दरवर्षी अयोध्या दीपोत्सव आयोजित केला जातो. २०२१ला या दीपोत्सवात ९ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.

हेही वाचा

Back to top button