

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाघोली, मोझे कॉलेज रस्ता येथील सोलांसिया सोसायटीच्या चेंबरमधे 3 कर्मचारी काम करताना अडकले होते. घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी दोघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले तर एकाचा शोध सुरू होता. दरम्यान बाहेर काढलेल्या दोघांचाही मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. चेंबर साफ करताना तिघांकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने मिळून आलेली नाहीत अशी प्राथमिक महिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. मृत्यू झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.