नितीशकुमारांच्या बिहारमध्ये नवा वाद, इयत्ता ७ वीच्या प्रश्नपत्रिकेत काश्मीरचा वेगळा देश म्हणून उल्लेख | पुढारी

नितीशकुमारांच्या बिहारमध्ये नवा वाद, इयत्ता ७ वीच्या प्रश्नपत्रिकेत काश्मीरचा वेगळा देश म्हणून उल्लेख

पाटणा; पुढारी ऑनलाईन : बिहारमधील किशनगंज जिल्ह्यात सातवीच्या सहामाही परीक्षेतील एका प्रश्नावरुन वाद निर्माण झाला आहे. बिहार शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता ७ वीच्या प्रश्नपत्रिकेत काश्मीर वेगळा देश असल्याचा उल्लेख केला आहे. यावरुन भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी आरोप केला आहे की हे सर्व फक्त सीमांचलमध्येच का होत आहे? बिहार सरकार काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग मानत नाही.

७ वीच्या प्रश्नपत्रिकेत या देशांतील लोकांना काय म्हणतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यामध्ये चीन, नेपाळ, इंग्लंड आणि भारतासह काश्मीरचा पर्यायही देण्यात आला आहे. याचा अर्थ असा की पेपरमध्ये काश्मीरचा उल्लेख भारतापासून वेगळा देश असल्याचा केला आहे.

दरम्यान, यावर खुलासाही करण्यात आला आहे. बिहार शिक्षण मंडळाच्या सातवीच्या सहामाही प्रश्नपरीक्षेत असा प्रश्न होता की काश्मीरमधील लोकांना काय म्हणतात? हे चुकीने झाले असून ही मानवी चूक होती असे मुख्याध्यापक एस. के. दास यांनी म्हटले आहे.
जायसवाल यांनी फेसबुक पोस्टद्वारे आरोप केला आहे की बिहार सरकारमधील पदाधिकारी आणि बिहार सरकार काश्मीरला भारताचा भाग मानत नाही. याचा पुरावा म्हणजे इयत्ता सातवीच्या प्रश्नपरीक्षेतील प्रश्न मुलांच्या मनात हे बिंबवण्याचे काम करत आहे की ज्याप्रमाणे चीन, इंग्लंड, भारत, नेपाळ हे एक देश आहेत त्याचप्रमाणे काश्मीर हेही एक राष्ट्र आहे.

हे ही वाचा :

Back to top button