NEET Aspirant Died In Kota : कोटामध्ये दूषित पाण्याने नीट परीक्षार्थीचा मृत्यू; ६० विद्यार्थी अस्वस्थ

NEET Aspirant Died In Kota : कोटामध्ये दूषित पाण्याने नीट परीक्षार्थीचा मृत्यू; ६० विद्यार्थी अस्वस्थ

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानच्या कोटा शहरातील विद्यार्थी वसतिगृहातील ६५ विद्यार्थी दूषित पाण्यामुळे आजारी पडले आहेत. यातील अनेकजण अत्यवस्थ असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नीट व इतर शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे हे वसतिगृह आहे. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव वैभव रॉय असून तो वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी करीत होता. (NEET Aspirant Died In Kota)

कोटा शहरातील जवाहर नगर भागात खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. येथील वसतिगृहातील अन्नाच्या अथवा पाण्याच्या दूषिततेमुळे अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यामुळे अनेक विद्यार्थी बाधित झाले आहेत. प्रथम विद्यार्थ्यांना उलट्या व पोटात दुखण्याचा त्रास सुरु झाला. त्रास सुरु झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अनेकांना काविळीची लक्षणे दिसून आली. (NEET Aspirant Died In Kota)

दरम्यान नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या वैभव रॉय यांची तब्बेत खूपच बिघडली होती. त्याच्या रिपोर्टमधून त्याला हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथीचे (hepatic encephalopathy) निदान झाले. यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारदरम्यान वैभव रॉय याचा मृत्यू झाला. (NEET Aspirant Died In Kota)

स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. यावेळी या प्रकरणी कोटाचे मुख्य आरोग्यअधिकारी जगदीश सोनी म्हणाले, वसतिगृहाच्या पाणी आणि भोजनाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येत आहे. जे विद्यार्थी आजारी आहेत, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माहिती दिली की, वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना पाण्यातून बाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांशिवाय आसपासचे लोक सुद्धा दूषित पाण्यामुळे आजारी पडले आहेत. (NEET Aspirant Died In Kota)

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news