Beer To Get Costlier in Goa : गोव्यात बीयर झाली महाग, सरकारने अबकारी कर वाढवला | पुढारी

Beer To Get Costlier in Goa : गोव्यात बीयर झाली महाग, सरकारने अबकारी कर वाढवला

पणजी; पुढारी ऑनलाईन : गोवा निसर्गरम्य पर्यटन आणि सागरी किनाऱ्यांसाठी जसा प्रसिद्ध आहे. तसाच तो स्वस्त दारु यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अनेक जण पर्यटनासोबत दारु पिण्याचा आनंद लुटण्यासाठी खास गोव्यात जातात. पण, हा आनंद आता फार काळ राहणार नाही. कारण गोवा सरकारने या दारुवरील अबकारी करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (Beer To Get Costlier in Goa)

गोव्याच्या भाजप सरकारने बिअरवरील अबकारी कर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने बीयर वरील अबकारी १० ते १२ रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोव्यात आता प्रति लिटर बिअरमागे १० ते १२ रुपये जादा मोजावे लागणार आहे. घाऊक बीयरवरील अबकारी कर आता ३० रुपये वरुन ४२ रुपये करण्यात आला आहे त्यामुळे आता आणखी १२ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. (Beer To Get Costlier in Goa)

गोव्यातील सरकारने यापुर्वी मद्यावरील अबकारी कर वाढण्याचे सुतोवाच दिले होते. त्याप्रमाणे आता बीयरवरील कर वाढविण्यात आला आहे. प्रीमिअम दर्जाच्या बीयर १५० रुपये प्रती बोटल मिळत होती आता तिच्यासाठी १६० रुपये मोजावे लागणार आहेत. पुर्वी या बोटलवरील कर हा ५० रुपये होता आता तो १० रुपयांनी वाढला आहे. (Beer To Get Costlier in Goa)

महाराष्ट्राने दारु तस्करीवरील निर्बंध वाढवले आहेत. तसेच असे करताना आढळल्यास त्यावर तातडीने मोक्का म्हणजे ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. या घटनेनंतर गोवा सरकारने त्यांच्या येथील अबकारी कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील तुलनेत गोव्यात स्वस्त दारु मिळते त्यामुळे अनेक तळीरामांचा ओढा गोव्याला भेट देण्यावर अधिक असतो. (Beer To Get Costlier in Goa)

गोवा सरकारने मद्याचे दर वाढवल्याने आता गोव्याला जाण्याचा प्लॅन करताना बजेटमध्ये वाढ करावी लागणार आहे. बीयर वरील कर वाढल्याने आता तळीरामांना आपला खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे.

अधिक वाचा :

Back to top button