धर्मांतराविरोधात कठोर कायदा; याचिका सुप्रीम कोर्टात दाखल | पुढारी

धर्मांतराविरोधात कठोर कायदा; याचिका सुप्रीम कोर्टात दाखल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जबरदस्तीने अथवा लालूच दाखवून केल्या जाणार्‍या धर्मांतराविरोधात कठोर कायदा करावा, अशा विनंतीची याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली.

धर्मांतराविरोधात कठोर कायदा करावा या याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती कृृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार, कायदा मंत्रालय, गृृह मंत्रालय तसेच सर्व संबंधितांना नोटिसा पाठवित 14 नोव्हेंबरपर्यंत उत्तर मागविले आहे. धमकावून, बळाचा वापर करून, धोका देऊन तसेच विविध प्रकारचे आमिष आणि लालूच दाखवून धर्मांतर करण्याचे प्रकार देशात वाढीस लागले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा केला जावा, असे याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेत म्हटले आहे. देशातला असा एकही जिल्हा नाही की ज्याठिकाणी येनकेन प्रकारेण धर्मांतराचे प्रकार घडलेले नाहीत, असे उपाध्याय यांचे वकील अश्विनीकुमार दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

Back to top button