Human Sacrifice in Kerala : मुख्य आरोपी मनोलैंगिक विकृतीने पछाडलेला, बळीनंतर मांसही शिजवून खाल्ल्याचा संशय

Human Sacrifice in Kerala : मुख्य आरोपी मनोलैंगिक विकृतीने पछाडलेला, बळीनंतर मांसही शिजवून खाल्ल्याचा संशय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Human Sacrifice in Kerala : केरळमधील एलांथूर येथे समृद्ध होण्यासाठी दोन महिलांच्या नरबळीच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. मंगळवारी 11 ऑक्टोबररोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर घटनेत दररोज नवीन माहिती समोर येत आहे. हे हत्याकांड घडवून आणलेला मुख्य आरोपी हा मनोलैंगिक वृत्तीने पछाडलेला आहे. त्याला दुस-याला अमानुष वेदना दिल्याने आनंद मिळतो आणि यासाठी त्याने इतरांच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणले. तसेच एक दशकापासून त्याचा गुन्हेगारीचा इतिहास आहे, असे पोलिसांनी सांगितले.

हत्याकांडातील 52 वर्षीय मुख्य आरोपी मोहम्मद शफी आणि त्याच्या दोन साथीदारांना बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

केरळचे आयजीपी सीएच नागराजू म्हणाले यांनी मुख्य आरोपी शफीबाबत माहिती देताना सांगितले, "शफीचे नाव 10 प्रकरणांमध्ये आहे आणि गेल्या दशकभरातील गुन्ह्यांमध्ये बलात्कार, चोरी आणि खुनाचा प्रयत्न यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी गुन्हा करताना कायम इतरांच्या माध्यमातून गुन्हा घडवतो. त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो संबंध वाढवतो ​​आणि इतरांना भागीदार म्हणून अडकवतो. याप्रकरणात देखिल त्याने भगवल सिंगच्या आणि त्याची पत्नी लैला यांच्या श्रीमंत होण्याच्या इच्छेचा फायदा घेतला आणि दोघांच्या माध्यमातून त्याने हे निघृण हत्याकांड घडवून आणले."

Human Sacrifice in Kerala महिलांचा बळी दिल्यानंतर आरोपींनी मांसही खाल्ले?

दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक बळींचे मास देखिल शिजवून खाल्ले असे वृत्त पसरत आहे. यावर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी सांगितले की, याबाबत टीम पुरावे शोधत आहे. टीम शरीराच्या अवयवांच्या 61 पॅकेटची तपासणी करत आहे, ज्यामध्ये 56 एकाच खड्ड्यात सापडले आहेत आणि पाच कंकाल भाग आहेत. डीएनए चाचणीसाठी नमुने घ्यावे लागतील. "शफी हा इयत्ता सहावी शिकल्यानंतर त्याने शिक्षण सोडले आहे आणि 17 व्या वर्षी घर सोडले आहे. त्याने वेटर, ट्रक ड्रायव्हर आणि मेकॅनिक म्हणून काम केले. एर्नाकुलममध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्याने राज्यभर प्रवास केला आणि अनेक ठिकाणी मुक्काम केला, "आयजीपी म्हणाले.

Human Sacrifice in Kerala मुख्य आरोपी शशीने असे घडवले हत्याकांड

मुख्य आरोपी शशी हा 4 वर्षांपासून अन्य आरोपी भगावल सिंग आणि लैला सिंग यांच्या संपर्कात होता. त्याने सर्वप्रथम एक बनावट एफ बी प्रोफाइल बनवले. नंतर चॅटद्वारे सिंग दाम्पत्याशी मैत्री केली. त्याने दोघांनाही आर्थिक समृद्धीचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी त्यांची ओळख 'गॉडमन रशीद'शी करून दिली आणि त्यांना प्रसन्न करण्यास सांगितले. हा गॉडमॅन रशीद दुसरा कोणी नसून तो स्वतःच होता. नंतर त्याने रशीद म्हणून स्वतःची ओळख करून दिली. दोघांवर त्याने सातत्याने प्रभाव टाकला. आणि त्यांच्या मनाचा ताबा घेतला. इतकेच नाही तर दोघेही दाम्पत्य रशीदचे आज्ञाधारक बनले.

त्यानंतर त्याने दोघांना "आर्थिक समृद्धीसाठी देवीला संतुष्ट करण्यासाठी" बळी द्यावे लागेल. त्यासाठी दोन महिला आपण मिळवून देऊ, असेही सांगितले. त्यासाठी शफीने दोघांकडून तीन लाख रुपये घेतले. शफीने रोझली आणि पदमम या दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून एलंथूर येथील सिंग यांच्या घरी जावून त्यांची हत्या केली.

Human Sacrifice in Kerala रस्‍त्‍यावर लॉटरी तिकिट विकणार्‍या महिलांना आमिष

एलमकुलम, कोचीवास येथील रस्‍त्‍यावर लॉटरी तिकिटाची विक्री करणार्‍या दोन महिला सप्‍टेंबरपासूनच बेपत्ता होत्‍या. त्‍यांच्‍या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्‍याची फिर्यादही दिली होती. शफी याने रोझली हिला पॉर्न चित्रपटात काम मिळवून देतो 10 लाख रुपये भेटतील असे आश्वासन देऊन तिला जूनमध्ये सिंगच्या घरी आणण्यात आले. नंतर तिचे खाटवर हात पाय बांधून तिघांनी तिची गळचेपी केली. तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि सिंगने तिची हत्या केल्याचे अहवालात म्हटले आहे.

तर पद्मजाला 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 च्या सुमारास पद्ममला सेक्ससाठी 15,000 रुपये देऊ करून शफीच्या कारमधून सिंगच्या घरी आणण्यात आले. तिने पैसे मागितल्यावर तिघांनी तिला दोरीने बेदम मारहाण केली आणि ती निघून गेली. शफीने नंतर तिची हत्या केली आणि दफनासाठी तिचे 56 तुकडे केले.

Human Sacrifice in Kerala महिलांच्‍या मोबाईल फोनमुळे नरबळीचे गूढ उकलले

कोचीचे पोलीस आयुक्‍त सीएच नागाराजू यांनी सांगितले की, "ज्‍या महिलांचा खून झाला त्‍या सप्‍टेंबरपासूनच बेपत्ता होत्‍या. त्‍यांच्‍या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्‍याची फिर्यादही पोलीस स्‍टेशनला दिली होती. पोलीसांनी या महिलांच्‍या मोबाईल फोनचे लोकशन तपासले. पोलीस त्रिरुवल्ला येथे पोहचले. येथील सीसीटीव्‍ही फुटेजची तपासणी केली. यामध्‍ये भागवल सिंग आणि त्याची पत्नी लैला व नरबळी देण्‍यात आलेल्‍या महिला दिसल्‍या. पोलिसांनी दाम्‍पत्‍याला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तिघांनीही पैशाच्‍या हव्‍यासापोटी दोन महिलांचा खून केल्‍याची कबुली दिली आहे."

दरम्यान, शफीच्या पत्नीने पतीचा बचाव केला. "आमच्या लग्नाला 24 वर्षे झाली आहेत आणि मला नाही वाटत की तो इतका भयानक गुन्हा करण्यास सक्षम आहे," असे ती म्हणाली.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news