

पुढारी ऑनलाईन – मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील २ गावात हातपंपाला पाण्याची जागी गावठी दारू येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील गावठी दारू विक्रेत्यांनी ही चलाखी केली होती. पोलिसांनी या गावात छापा टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चंचोडा आणि राघोगड अशी या गावांची नावे आहेत. (Madhya Pradesh Hand Pumps Give Out Liquor)
गावठी दारू विक्रेत्यांनी जमिनी खाली ७ फूटावर खड्डा खणून त्यात टाक्या बसवल्या होत्या आणि त्यात गावठी दारू भरण्यात येत होती. आणि या टाक्यांवर हातपंप बसवण्यात आले होते. हातपंपातून दारू काढून ती प्लास्टिकच्या पिशव्यात भरून विकली जात होती. या छाप्यात हजारो लिटर दारू जप्त कऱण्यात आली आहे.
दारू बनवणाऱ्या या लोकांच्या घरातून आणि हातपंपा खाली बसवलेल्या टाक्यांतून मोठ्या प्रमाणावर दारू जप्त करण्यात आली आहे. हा हातपंप या लोकांच्या वस्तीपासून दूर अंतरावर होता, अशी माहिती चंचोडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक रवी गुप्ता यांनी दिली आहे. "या हातपंपातून पाण्याच्या जागी दारू येत होती, हे पाहून आम्हालाही धक्का बसला. हातपंपा खाली ४०० लीटर क्षमतेची टाकी बसवण्यात आली होती, आणि त्यात गावठी दारू भरली जात होती," असे ते म्हणाले.
हेही वाचा