वादग्रस्त वक्तव्यानंतर केजरीवाल सरकारमधील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांचा राजीनामा | पुढारी

वादग्रस्त वक्तव्यानंतर केजरीवाल सरकारमधील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजेंद्र पाल गौतम यांनी रविवारी (दि ९) मंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजेंद्र पाल गौतम यांनी आपला राजीनामा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवला आहे. राजेंद्र पाल यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये राजेंद्र पाल म्हणाले, आज महर्षी वाल्मिकी यांचा प्रकटदिन आहे. तर काशीराम साहेब यांची आज पुण्यतिथी आहे. अशा दिवशी मी अनेक बंधनातून मुक्त झालो. आज माझा पुर्नजन्म झाला आहे. आता मी ठामपणे समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवू शकेन.

राजीनाम्यात राजेंद्र पाल यांनी कशाबाबत उल्लेख केला?

राजेंद्र पाल गौतम यांनी राजीनाम्यात म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मी पहात आहे की, समाजातील महिला आणि मुलींवर बलात्कार करून हत्या करण्याचे प्रकार वाढले आहेत. घोड्यावरून वरात काढली म्हणून हल्ला करून हत्याही करण्यात आल्या, अशा जातीय भेदभावांच्या घटनांमुळे माझे मन व्यथीत झाले आहे.

राजेंद्र गौतम म्हणाले, मी ५ ऑक्टोंबरला झासीची राणी रोडवर मिशन जय भीम तथा बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडून घेण्यात आलेल्या बौद्ध दीक्षा समारंभात सामील झालो होतो. याचा आम आदमी पक्षाचा आणि माझ्या मंत्रीपदाशी काहीही संबंध नव्हता. बौद्ध दीक्षा समारंभात बाबासाहेब आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञा १० हजारांपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत वाचल्या गेल्या. यानंतर भाजप नेते अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर टीका करत आहेत. हे माझ्यासाठी फार दुख:द आहे.

राजेंद्र पाल यांच्यावर भाजपचे आरोप

भाजप नेते मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षावर हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला होता. मनोज तिवारी म्हणाले की, तुमचे मंत्री हिंदू धर्माविरोधात शपथ घेत आहेत. हा हिंदू धर्माचा अपमान आहे. आपचे मंत्री दंगली भडकवण्याचे काम करत आहेत. राजेंद्र पाल यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. आम्ही राजेद्र पाल गौतम यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहोत.

हेही वाचलंत का?

Back to top button