Bihar Excise VIP Ward : बिहारमध्‍ये दारुबंदी, मात्र मद्यपी ‘व्हीआयपी’च्‍या तपासणीसाठी ‘लक्झरी’ वॉर्ड | पुढारी

Bihar Excise VIP Ward : बिहारमध्‍ये दारुबंदी, मात्र मद्यपी 'व्हीआयपी'च्‍या तपासणीसाठी 'लक्झरी' वॉर्ड

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये दारू पिण्यास मनाई आहे; पण व्हीआयपींना ( अति महत्त्‍वाच्‍या व्‍यक्‍ती  ) दारूच्या नशेत पकडले तर त्‍याच्‍या तपासणीसाठी लक्झरी हॉटेलसारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. बिहारच्या समस्तीपूर उत्पादन शुल्क विभागामार्फत (Bihar Excise VIP Ward)  ही माहिती देण्यात आली आहे. या व्हीआयपी वॉर्डमध्ये दारुच्‍या नशेत आलेल्‍यांना आराेग्‍य तपासणीवेळी लक्झरी हॉटेलसारख्या सुविधा मिळणार आहेत.

समस्तीपूर उत्पादन शुल्क विभागाने व्हीआयपी व्यक्तीसाठी २४ तासांसाठी ठेवलेल्या व्यक्तीसाठी व्हीआयपी वॉर्ड बनवला आहे. जर व्हीआयपीला दारूच्या नशेत पकडले तर त्याला २४ तास या वॉर्डमध्ये ठेवले जाईल. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. के चौधरी यांनी दिलेल्या माहितीनूसार, हे वॉर्ड सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्यासाठी बनवले गेले आहे. दारूच्या नशेत पकडले गेल्यानंतर त्यांना या वॉर्डमध्ये ठेवले जाईल.  वाॅर्डमध्‍ये वैद्‍यकीय तपासणीसाठी आलेल्‍यांना  दोन पलंग, सोफा, टेबल तसेच त्‍यांच्‍या सुरक्षेसाठी एक कुत्राही तैनात करण्‍यात आला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एप्रिल २०१६ मध्ये बिहारमध्ये दारूबंदीची घोषणा केली. त्यानंतर राज्यात मद्य उत्पादन, विक्री आणि सेवनावर बंदी घालण्यात आली. उल्लंघन करणाऱ्याला जबर दंड आणि शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, नंतर या कायद्यात सुधारणा करून दंडाची रक्कम कमी करण्यात आली. नव्या कायद्यानंतर मद्यपान करताना पकडले गेल्यास दंड भरून आरोपीची सुटका होऊ शकते. यापूर्वी दारूच्या नशेत पकडल्यास आरोपीला तुरुंगात पाठवले जात होते.

हेही वाचा

Back to top button