Nitish Kumar vs Prashant Kishore : प्रशांत किशोरांचा नितीशकुमारांवर पलटवार, म्‍हणाले "ते वेगळेच..." | पुढारी

Nitish Kumar vs Prashant Kishore : प्रशांत किशोरांचा नितीशकुमारांवर पलटवार, म्‍हणाले "ते वेगळेच..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर वयाचा परिणाम त्यांच्यावर हळूहळू होऊ लागला आहे. त्यांना काही बोलायचे असते; पण ते वेगळेच बोलतात, असा पलटवार निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांनी शनिवारी केलेल्या गंभीर आरोपावर (Nitish Kumar vs Prashant Kishore) केला आहे.

प्रशांत किशोर (Nitish Kumar vs Prashant Kishore)  म्हणाले की, नितीशकुमार म्हणतात की मी भाजपच्या अजेंड्यावर काम करत आहे, मग ते स्वतःच म्हणतात की मी त्यांना जेडीयू काँग्रेसमध्ये विलीन करण्यास सांगितले. जर मी भाजपच्या अजेंड्यावर काम करत असेल. तर मी त्यांना काँग्रेस आणि जेडीयू मजबूत करण्यासाठी एकत्र विलीन होण्यास का सांगेन.

नितीश कुमार यांच्यावर आता वयाचा परिणाम दिसून येत आहे, त्यांना काही बोलायचे असते. पण ते वेगळेच बोलतात. जर मी भाजपच्या अजेंड्यावर काम करत असतो, तर काँग्रेस मजबूत करण्याबद्दल का बोललो असतो? ते राजकीयदृष्ट्या एकाकी पडत चालले आहेत. ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही अशा लोकांनी त्यांना घेरले आहे, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांच्यावर शनिवारी (दि.८) गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, एकदा प्रशांत माझ्याकडे आला होता.पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करण्यास सांगत होता, तेव्हा मी नकार दिला. आम्ही प्रशांत किशोर यांना भेटायला बोलावले नव्हते, ते स्वतः  माझ्‍याकडे आले होते. प्रशांत किशोर खोटे बोलत आहेत. तो पूर्वी माझ्यासोबत माझ्या घरी राहत असे. आता त्यांच्याबद्दल काय बोलावे, त्यांना कुठे जायचे आहे, याची आम्हाला पर्वा नाही, असेही नितीशकुमार म्हणाले होते.

हेही वाचलंत का ?  

Back to top button