Airtel 5G : एअरटेल 5G plus ची सेवा देशातील ‘या’ महत्त्वाच्या ८ शहरांत सुरू; 4G यूजर्संनाही मिळणार लाभ

Airtel5GPlus is NOW live in 8 cities
Airtel5GPlus is NOW live in 8 cities

पुढारी ऑनलाईन : भारती एअरटेलने देशात नुकतीच Airtel 5G Plus सेवा सुरू केली आहे. Airtel 5G Plus दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी या देशातील पहिल्या आठ शहरांमध्ये लाँच करण्यात आले आहे. याची घोषणा करताना, कंपनीने सांगितले की 5G प्लस सेवांचा (Airtel 5G) लाभ घेण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची आवश्यकता नाही कारण यूजर्संना 5G नेटवर्कचा लाभ हा एअरटेल 4G सिममध्ये घेता येणार आहे.

भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गोपाल विट्टल यांनी Airtel 5G Plus सेवा लाँच करताना सांगितले की, आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी सर्वोत्तम नेटवर्क तयार करत आहोत. आमच्या प्रवासात आज आणखी एक पुढचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही करत असलेल्या प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी प्रथम आमचे ग्राहक आणि यूजर्स (Airtel 5G) असतात. आमच्या यूजर्सचा अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी आम्ही 5G सेवा सुरू केली आहे आणि ती पर्यावरणपूरक देखील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

20-30 पटीने वाढणार नेटवर्क स्पीड

Airtel ने दावा केला आहे की, 5G Plus मुळे यूजर्संना सध्याच्या इंटरनेट स्पीडपेक्षा 20-30 पट जास्त स्पीड मिळेल. यूजर्संना कॉलिंग दरम्यान स्पष्ट आवाजासह सुपर फास्ट कॉल कनेक्टची सुविधा देखील मिळेल. कंपनीने असेही म्हटले आहे की 5G Plus सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही, ते फक्त विद्यमान Airtel 4G सिममध्ये 5G नेटवर्क वापरू शकतात.(अधिक माहितीसाठी यावर क्लिक करा : https://www.airtel.in/press-release/10-2022/airtel-5g-plus-launched-today)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news