केजरीवाल यांची नायब राज्यपालांवर टीका; इतके तर मला पत्नी देखील रागावत नाही | पुढारी

केजरीवाल यांची नायब राज्यपालांवर टीका; इतके तर मला पत्नी देखील रागावत नाही

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना मला रोज जितके रागावतात, तितके तर मला माझी पत्नी देखील रागावत नाही, असा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकारदरम्यान अनेक कारणांवरून धुमसान सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ही टीका केली आहे.

गेल्या सहा महिन्यांत सक्सेना यांनी मला जितके लव्ह लेटर लिहिले आहेत, तितके माझ्या पत्नीने अख्ख्या आयुष्यात लिहिले नाहीत. नायब राज्यपाल साहेब, थोडे शांत घ्या आणि तुमच्या सुपरबॉसला देखील शांत राहायला सांगा, असे केजरीवाल यांनी संदेशात म्हटले आहे. अलीकडेच व्ही. के. सक्सेना यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्र लिहित महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास गैरहजर राहण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

हेही वाचा  

Ethanol sales: कारखानदारांनी कमावला १८ हजार कोटींचा महसूल 

पनवेल: हार्बर लाईनवर रेल्वेमध्ये महिलांची फ्री स्टाईल मारामारी..!

Sandeep Lamichhane : ‘या’ आयपीएल क्रिकेटरला बलात्कार प्रकरणी अटक

Back to top button