Uttarakhand Accident : उत्तराखंडमध्ये वऱ्हाडाची बस दरीत कोसळली; मोठ्या जिवीतहानीची भीती

Uttarakhand Accident : उत्तराखंडमध्ये वऱ्हाडाची बस दरीत कोसळली; मोठ्या जिवीतहानीची भीती

देहरादून; पुढारी ऑनलाईन : उत्तराखंड राज्यातील पौढी गढेवाल जिल्ह्यात लग्नसमारंभातील ४० ते ५० लोकांना घेऊन जाणारी बस दरीमध्ये कोसळली. हा भीषण अपघात पौढी गढेवाल जिल्ह्यातील बीरोंखोल भागात घडल्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली आहे. या अपघात मोठी जिवीतहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थ शोध मोहीम राबवत आहेत. (Uttarakhand Accident)

अपघात झालेली बस वऱ्हाडीमंडळींना घेऊन लालढांग गावाकडून बीरोंखोल गावाकडे जात होती. दरम्यान वाटेत वाहन दुर्घटनाग्रस्त झाले. सायकाळी सात ते साडेसात दरम्यान हा अपघात घडला असल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु असून अंधारामुळे मदतकार्यात अडचणी निर्माण होत आहे. मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने शोध घेतला जात आहे. स्थानिक रहिवाशांनी माहिती दिली की, अपघातग्रस्त ठिकाणी प्रकाश योजनेची कोणतीही सोय नाही. लोक आपल्या मोबाईलच्या टॉर्चद्वारे बसमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहे. या अपघात मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता अधिक आहे. महत्त्वाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील माहितीची सर्वजण वाट पहात आहेत. (Uttarakhand Accident)

दरम्यान अपघातग्रस्त बस खूप खोल दरी पडली आहे. बस मधील लोकांचा शोध घेतला जात आहे. काही जखमींना बीरोंखोल गावातील ग्रामीण रुग्णालायत हलविण्यात आले आहे. तसेच आसपासच्या पोलिस स्थानकातून जादाचे पोलिस घटनास्थळी पाठविण्यात आले आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल सांगितले की, एसडीआरएफचे पथक घटनास्थळी बचावकार्यात गुंतले आहेत. घटनास्थळी सर्व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बचावकार्यात स्थानिक लोक मदत करत आहेत. (Uttarakhand Accident)


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news