IAF LC Helicopter| ‘एलसीएच’ हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात दाखल, जाणून घ्या त्याविषयी | पुढारी

IAF LC Helicopter| ‘एलसीएच’ हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात दाखल, जाणून घ्या त्याविषयी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत जोधपूर एअरबेसवर ‘एलसीएच’ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात आज (दि.३) सामील झाले. लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (IAF LC Helicopter) हवाई दलाला सुपूर्द करण्यापूर्वी येथे एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चारही समाजाचे धर्मगुरू उपस्थित होते. कार्यक्रमानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या हेलिकॉप्टरमधून टेकऑफ केले.

नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी हवाई दलाच्या ताफ्यात सामील झालेल्या लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरला (LCH) राजनाथ सिंह यांनी ‘प्रचंड’ असे नाव दिले आहे. २२ वर्षांपूर्वी भारताने जे स्वप्न पाहिले होते. ते आता पूर्ण झाले आहे. इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर सोमवारी हवाई दलाला स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) मिळाले आहे. हे हेलिकॉप्टर हवाई दलात सामील झाल्यानंतर भारताची ताकद प्रचंड वाढली आहे, अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली.

IAF LC Helicopter : ‘एलसीएच’ची वैशिष्ट्ये

  • दर मिनिटाला 750 गोळ्या डागण्याची क्षमता
  • स्वदेशी डिझाईन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान
  • 5.8 टन वजन असणार्‍या हेलिकॉप्टरमध्ये दोन इंजिन्स
  • कोणत्याही हवामानात उड्डाण भरण्याची क्षमता
  • आकाशातून शत्रूवर नजर ठेवण्यास सक्षम
  • हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता
  • फॉरवर्ड इन्फ्रारेड सर्च, सीसीडी कॅमेरा आणि थर्मल व्हिजन आणि लेसर शोधण्यास सक्षम
  • रात्रीच्या मोहिमा आणि अपघात टाळण्याची क्षमता

लडाखमध्ये ‘एलसीएच’ तैनात

1996 मध्ये कारगील युद्धात शत्रू उंचीवर असताना ‘एलसीएच’सारख्या हेलिकॉप्टरची उणीव भासली होती. या हेलिकॉप्टरबाबतची माहिती पहिल्यांदा 2006 मध्ये सरकारला समजली. 2015 मध्ये त्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी हेलिकॉप्टरने 20 हजार ते 25 हजार फूट उंचीवर उड्डाण भरले. गेल्या वर्षी चीनसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर या हेलिकॉप्टरचे दोन ताफे लडाखमध्ये तैनात करण्यात आले होते.

या हेलिकॉप्टरमध्ये वाळवंट, बर्फाच्छादित पर्वतांसह प्रतिकूल परिस्थितीत शत्रूंवर हल्ला करण्याची क्षमता आहे. त्याची तोफ दर मिनिटाला ७५० गोळ्या डागू शकते. तर, टँकरविरोधी आणि हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रेही डागता येतात.

हेही वाचलंत का ? 

Back to top button