

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात अचानक हृदयविकाराच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. काळजी वाढविणारी बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे, असे स्पष्ट करत भारत हा जगातील ह्दयविकाराची राजधानी बनत आहे, असा इशारा कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने ( सीएसआय ) दिला आहे. ( Chronic heart disease)
नुकताच झालेल्या जागतिक हृदय दिनानिमित्त 'सीएसआय'ने हृदयविकाराच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी एक जागरूकता कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये पाच हजारांहून अधिक डॉक्टरांनी भाग घेतला. यावेळी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी कौन्सिलचे निमंत्रक आणि जयपूरमधील प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, इंर्टनल मेडिसिन आणि रिसर्चचे अध्यक्ष डॉ राजीव गुप्ता म्हणाले की, "केवळ तरुणांनाच नाही तर शाळकरी मुलांनाही तीव्र हृदयरोगाचा त्रास होत असून, याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. शाळकरी मुलांना क्रॉनिक हार्ट डिसीजच्या येऊ घातलेल्या धोक्याची जाणीव करून दिली पाहिजे. जेणेकरून ते मोठे झाल्यावर ते चांगले नागरिक बनू शकतील,"
भारत आता जगातील दीर्घकालीन हृदयविकाराची राजधानी आहे. प्रदूषण, नैराश्य, स्क्रीन टाइम वाढणे, साखरेचे जास्त सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे भारतात तीव्र ह्दयविकाराचे प्रमाण का वाढत आहे, असे निरीक्षण डॉ. गुप्ता यांनी नोंदवले.
मागील काही वर्षांमध्ये देशातील लोकांच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, कार्बयुक्त आहार खाणे, आहारातील 86% कर्बोदके असतात. धूम्रपान कमी झाले आहे; पण तरीही ते समाधानकारक नाही. मद्य सेवन झपाट्याने वाढत आहे. फास्ट फूड चेन येत आहेत. त्यापैकी कोणीही FSSAI ने शिफारस केलेल्या चरबी, मीठ आणि साखरेच्या पातळीचे पालन करत नाहीत. यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढ आहे, असे 'सीएसआय'चे वरिष्ठ सल्लागार डॉ देबब्रत रॉय यांनी सांगितले.
"हृदयविकाराच्या वाढीस कारणीभूत आणखी एक घटक म्हणजे प्रदूषण. मुले शाळेत जाताना प्रवास करताना तेव्हा प्रदूषणाच्या संपर्कात येतात त्यामुळेतरुण प्रौढांमध्ये हद्यविकाराचा त्रास होण्याची शक्यता वाढवू शकते. वाहतुकीसाठी स्वच्छ इंधनाचा पर्यान निवडल्यास निश्चितपणे ह्दयविकाराच्या जोखमीमध्ये काही बदल होतील.", असे निरीक्षण 'सीएसआय'च्या तज्ज्ञांनी नोदवले आहे.
हेही वाचा :