#World Heart Day : हृदयासाठी ‘हे’ पाच पदार्थ ठरतात घातक

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : नवी दिल्‍ली

दररोजच्‍या धावपळीच्‍या नादात आहाराकडे लक्ष देण्‍यास वेळ मिळत नाही. याचा परिणाम  आरोग्‍यावर होतो. संतुलीत आरोग्‍य असेल तरच आपले ह्‍दय तंदुरुस्‍त राहण्‍यास मदत होते. शरीरातील ह्रदय हा एक महत्‍त्‍वाचा भाग आहे.  धावपळीत आपण ह्रदयाची काळजी घेण्‍याचे विसरतो. भूख शांत करण्‍यासाठी पर्याय म्‍हणून बाहेर मिळेल ते खाले जाते पण त्‍याचा परिणाम आपल्‍या आरोग्‍यावर होत असतो. यामुळे शरीराची जाडी तर वाढतेच पण याचा थेट परिणाम ह्‍दयावर होत असतो.  यासाठी आज जागतिक ह्रदय दिनानिमित्त  जाणून घेवूया  असे पाच पदार्थ जे  ह्रदयासाठी ठरतात घातक….

१. एनर्जी ड्रिंक्‍स आणि सोडा

तहान लागली, थकवा आला की आठवते ते एनर्जी ड्रिंक्‍स किंवा सोडापाणी. पण एनर्जी ड्रिंक्‍समध्‍ये कॅफेनची मात्रा जास्‍त असते. कॅफेन हे हृदयासाठी  योग्‍य नाही. कारण याचा परिणाम हृदयाच्‍या स्‍पंदनावर होतो. म्‍हणजे ह्रयाचे ठोके कमी जास्‍त होतात.  तसेच सोडापाण्‍यामुळेही  रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढते व  हृदय आणि शरीर यांच्‍यामध्‍ये रक्‍त पुरवठा करणार्‍या धमन्‍यांमध्‍ये अडथळा निर्माण होतो. 

२. चिप्‍स

लहानांपासून मोठ्‍यापर्यत  संगळ्‍यांना चिप्‍स, स्‍नॅक्‍स खायला आवडते. पण चिप्‍स हृदयासाठी,  आरोग्‍यासाठी  उपयुक्‍त नसतात. एका अभ्‍यासानुसरा जे लोक दररोज २०० मिलिग्रामपेक्षा जास्‍त सोडियमयुक्‍त पदार्थ खातात त्‍यांना हृदय  विकार होण्‍याची शक्‍यता असते. चिप्‍समध्‍ये मीठाचे प्रमाण जास्‍त असते व त्‍यात सोडियम, कार्ब्‍स यांचे प्रमाणही जास्‍त असते. 

३. पिज्जा, नूडल्‍स आणि चाइनीज फूड

पिज्‍जा, चाइनीज़ फूड फॅट आणि सोडिमचे घर आहे. सॉसमध्‍ये  सोडियमचे प्रमाण जास्‍त असल्‍यामुळे  धमन्‍या ब्‍लॉक होण्‍याची शक्‍यता असते.  नूडल्‍सच्‍या एका पाकिटात ८७५ मिलिग्राम सोडियमची मात्रा असते, असे एका अभ्‍यासातून समोर आले आहे. याचा परिणाम, मेंदू, हृदय म्‍हणजे  संपूर्ण शरीरावर  होण्‍याची शक्‍यता असते. 

४. चिकन

चिकनमध्‍ये प्रथिन्‍यांचे प्रमाण जास्‍त असते. पण बाजारात उपल्‍बध असेलेल्‍या तळलेल्‍या, मसालेदादर चिकनमध्‍ये कॅलरीजचे प्रमाण जास्‍त असते. जास्‍त मसालेयुक्‍त  किंवा तळलेले पदार्थ ह्रदयासाठी घातक ठरतात.

५. कॉफी 

झोप घालविण्‍यासघटी लोक कॉफी पितात. कॅफीमध्‍ये कॅलीरजचे प्रमाण जास्‍त असते व त्‍यामुळे शरीरातील जरबीमध्‍ये वाढ होते.  रक्‍तातील साखरेचे प्रमाण कॉफीमुळे वाढते.  कॉफी जरी कडू असली तरी साखरेचे प्रमाण त्‍यात जास्‍त असते. मधूमेह व हृदय विकाराचा त्रास असणार्‍यांनी कॉफीचे सेवन टाळावे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news