दिल्‍लीत युवकाचा निर्घृण खून : सुंदर नगरी भागात तणाव | पुढारी

दिल्‍लीत युवकाचा निर्घृण खून : सुंदर नगरी भागात तणाव

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – मोबाईल चोरीचा गुन्हा मागे घेतला नाही म्हणून मनिष नावाच्या युवकाचा चाकूने वार करुन निर्घृण खून करण्याचा प्रकार शनिवारी रात्री दिल्लीतील सुंदर नगरी भागात घडला. या प्रकरणातील आलम, बिलाल आणि फैजान नावाच्या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर रविवारी नंदनगरी येथे दोन गट आमने-सामने येऊन तणाव निर्माण झाला होता. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. एका गटाने मुख्य रस्त्यावर येत काही काळ रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला. मनिष याच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडीयात व्हायरल झाला आहे. मनिषची हत्या होत असताना त्याच्या आजुबाजुला अनेक लोक होते, पण त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही.

हेही वाचा : 

 

 

Back to top button