Jawa 42 Bobber स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच! वाचा किंमत आणि आकर्षक फिचर्स | पुढारी

Jawa 42 Bobber स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच! वाचा किंमत आणि आकर्षक फिचर्स

पुढारी ऑनलाइन डेस्क : बाईक प्रेमींसाठी विशेष करून स्पोर्ट बाईक्सचे पॅशन असणा-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Jawa Yezdi ने आज भारतात Jawa 42 Bobber लाँच केली आहे. दिल्लीमध्ये या बाईकची एक्स-शोरूम, किंमत 2 लाख 6 हजार 500 रुपये आहे. जावा पेराकच्या धर्तीवर ही बाईक तयार करण्यात आली आहे. नावाप्रमाणेच जावा बॉबर ही सिंगल सीट सेटअपमध्ये डिझाईन केली आहे. गाडीचे इंजिन पेराक सारख्याच इंजिनप्रमाणे आहे.

स्टाईलिश Jawa 42 Bobber

जावा येझडीने लाँच केलेली ही Jawa 42 Bobber खूप स्टाईलिश आणि आकर्षक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. मूनस्टोन व्हाईट आणि ड्युअल टोन जॅस्पर रेड आणि मिस्टिक कॉपर या तीन आकर्षक रंगांमध्ये ही गाडी डिझाइन करण्यात आली आहे. सोबतच याला सेट फूटपेग देखिल देण्यात आले आहे. रंगानुसार किंमतीत थोडा-फार फरक आहे. जावा 42 बॉबरची किंमत मिस्टिक कॉपरसाठी 2,06,500 रुपये, मूनस्टोन व्हाईटसाठी 2,07,500 रुपये आणि जास्पर लाल (ड्युअल-टोन) साठी 2,09,187 रुपये आहे.

नवीन 42 बॉबर दोन्ही जगातील सर्वोत्कृष्ट गोष्टींचा मेळ घालतो – सीईओ जोशी

क्लासिक लीजेंड्सचे सीईओ आशिष सिंग जोशी यावेळी म्हणाले की, “पेराक सोबत, आम्ही देशात एक नवीन ‘फॅक्टरी कस्टम’ विभाग तयार केला आणि त्याची लोकप्रियता आणि फॅन फॉलोइंग कोणापासूनही लपलेले नाही. नवीन 42 बॉबर दोन्ही जगातील सर्वोत्कृष्ट गोष्टींचा मेळ घालतो आणि बॉबरची कामगिरी आणि व्यक्तिमत्त्व 42 मधील तरुणपणा आणि जिवंतपणाचे मिश्रण करतो,”

४२ बॉबरची डिलिव्हरी ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू होईल. कंपनी आपल्या ग्राहकांना खरेदी करण्यात मदत करण्यासाठी वित्त योजना सादर करत आहे. जावा येझदी येत्या काही महिन्यांत आपल्या डीलरशिप नेटवर्कचा 500 टचपॉइंट्सपर्यंत विस्तार करणार आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये

  • 30 hp आणि 32.74 Nm टॉर्क निर्माण करणारे आणि 6 स्पीड ट्रांसमिशनसह जोडलेले 334cc सिंगल-सिलेंडर इंजिन
  • कॉन्टिनेंटल ड्युअल-चॅनल ABS मानक
  • सस्पेंशन सेटअप पुन्हा ट्यून केला गेला आहे आणि 42 बॉबरसाठी ब्रेक पुन्हा कॅलिब्रेट केले गेले आहे
  • पुन्हा डिझाइन केलेले सीट पॅन, कुशनिंग आणि अपहोल्स्ट्री असलेले नवीन फ्लोटिंग सीट युनिट
  • नवीन हँडलबार, नवीन फॉरवर्ड फूट कंट्रोल्स (फूट पेग आणि लीव्हर्स), आणि सीट नवीन रायडरचा त्रिकोण देतात
  • रायडर सोईनुसार मागे-पुढे हलवण्याची सुविधा

इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा राडा; १२७ जणांचा मृत्यू

Navi Mumbai : drugs seized : मोठी कारवाई, संत्र्याच्या पेटीत लपवून तस्करी केलेले 1,476 कोटी रुपयांचे 207 किलो ड्रग्ज जप्त

Back to top button