`India’s cleanest city’ : स्वच्छ शहरात इंदूर नेहमीच कसे पहिले येते? जाणून घ्या कचरा व्यवस्थापनाचे तंत्र! | पुढारी

`India's cleanest city' : स्वच्छ शहरात इंदूर नेहमीच कसे पहिले येते? जाणून घ्या कचरा व्यवस्थापनाचे तंत्र!

पुढारी ऑनलाइन डेस्क : `India’s cleanest city’ : केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यावेळी देखिल मध्यप्रदेशातील इंदूर शहराला सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला. त्यानंतर सुरत आणि नवी मुंबईचा क्रमांक लागतो. इंदूरला सलग 6 व्या वेळी सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. शहरातील 1900 टन शहरी कच-यावर प्रक्रिया करून त्यातून कोट्यावधी रुपयांची कमाई करते. तसेच शहरात चालणा-या 150 सिटी बसचे इंधनही मिळवते. या वैशिष्ट्यांमुळे इंदूर सलग 6 व्यां दा सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरले. पण इंदूर हे सर्व नियोजन कसे करते हे पाहणे इथे महत्वाचे ठरते.

`India’s cleanest city’ स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील शहरा-शहरांमध्ये स्वच्छता मोहिमांचे वारे वाहू लागले. त्यात इंदूर देखिल पाठीमागे नाही. सर्वसाधारणपणे सर्व शहरांचा ओला आणि सुका कचरा वर्गिकरणावर भर असतो. मात्र, इंदूरमध्ये सहा श्रेणींमध्ये कच-याचे वर्गिकरण केले जाते. विशेष म्हणजे कचरा गोळा करतानाच वेगवेगळा गोळा केला जातो.

‘स्वच्छ शहर’ कागदावरच; फुरसुंगी, उरुळी देवाची भागांत सार्वजनिक स्वच्छतागृहेच नाहीत

`India’s cleanest city’ : इंदूर हे मध्य प्रदेशातील 35 लाख लोकसंख्येचे सर्वात मोठे शहर आहे. तसेच राज्याची व्यावसायिक राजधानी म्हणूनही तिला ओळखले जाते. शहरात दररोज 1200 टन सुका तर 700 टन ओला असा एकूण 1900 टन कचरा निर्माण होतो. तरी देखिल इंदूर हे कचरामुक्त शहर आहे.

याविषयी, “आमच्याकडे 850 वाहने आहेत जी घरोघरी आणि व्यावसायिक आस्थापनांमधून कचरा गोळा करतात आणि त्याचे सहा श्रेणींमध्ये विभाजन करतात,” असे इंदूर महानगरपालिकेचे (IMC) स्वच्छता विभागाचे अधीक्षक अभियंता महेश शर्मा यांनी सांगितले.

`India’s cleanest city’ : याविषयी अधिक माहिती देताना शर्मा म्हणाले, वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्यासाठी वाहनांमध्ये स्वतंत्र कप्पे आहेत. टाकून दिलेले सॅनिटरी नॅपकिन्स, उदाहरणार्थ, वेगळ्या डब्यात जा. संकलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर ही क्रमवारी कार्यक्षम प्रक्रियेसाठी उपयोगी पडते. आयएमसीच्या कचरा विल्हेवाट प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘बायो-सीएनजी प्लांट’! जो शहरातून गोळा केलेल्या ओल्या कचऱ्यावर चालतो. शहराच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही आशियातील सर्वात मोठी अशी सुविधा आहे.

`India’s cleanest city’ : या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवगुराडिया ट्रेंचिंग ग्राउंडवर 150 कोटी रुपये किमतीच्या या 550 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेच्या प्लांटचे उद्घाटन केले. ते 17,000 ते 18,000 किलो बायो-सीएनजी आणि 10 टन सेंद्रिय खत तयार करू शकते. व्यावसायिक सीएनजीपेक्षा 5 रुपये स्वस्त असलेल्या या बायो-सीएनजीवर तब्बल 150 सिटी बसेस चालवल्या जात आहेत.

`India’s cleanest city’ : आयएमसीने गेल्या आर्थिक वर्षात कचऱ्याच्या विल्हेवाटातून 14.45 कोटी रुपये कमावले, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कार्बन क्रेडिटच्या विक्रीतून 8.5 कोटी रुपये आणि बायो-सीएनजी प्लांटला कचरा पुरवण्यासाठी खासगी कंपनीकडून वार्षिक प्रीमियम म्हणून 2.52 कोटी रुपये मिळाले.

चालू आर्थिक वर्षात, नागरी संस्थेला कचरा विल्हेवाटातून 20 कोटी रुपये मिळण्याची आशा आहे, असे शर्मा म्हणाले. इंदूर स्वच्छ ठेवण्यासाठी सुमारे 8,500 सफाई मित्र (स्वच्छता कामगार) तीन शिफ्टमध्ये काम करतात, असेही ते म्हणाले.

`India’s cleanest city’ : शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर तीन विशेष प्लांटमध्ये प्रक्रिया केली जाते आणि 200 सार्वजनिक उद्याने, शेततळे आणि बांधकाम कामांसाठी त्याचा पुनर्वापर केला जातो, असे फलोत्पादन अधिकारी चेतन पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Swachh Survekshan 2022: सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने पटकावले तिसरे स्थान; पुणे पहिल्या दहातून बाहेर

अभिमानास्पद! स्वच्छता लीग 2022 मध्ये राष्ट्रीय पातळीवर लोणावळा शहर अव्वल

Back to top button