आशियाई विकास बँकेकडून ‘जीडीपी’ दराच्या अंदाजात घट | पुढारी

आशियाई विकास बँकेकडून 'जीडीपी' दराच्या अंदाजात घट

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा -आशियाई विकास बँक अर्थात एडीबीने चालू आर्थिक वर्षातील देशाच्या जीडीपी दराच्या अंदाजात घट केली आहे. भारताचा जीडीपी दर 7.2 टक्के राहील, असे भाकित याआधी एडीबीने वर्तविले होते. हा अंदाज आता 7 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. कठोर पतधोरण आणि वाढती महागाई याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणे अपरिहार्य असल्याचे एडीबीने आपल्या ताज्या अहवालात नमूद केले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी दर साडेतेरा टक्के इतका नोंदविला गेला होता. मात्र उर्वरित तीन तिमाहीत विकासाची ही गती कायम राहण्याची शक्यता कमी आहे. वस्तू आणि सेवांच्या मागणीतील घट, जागतिक मागणीवर पडत असलेला प्रभाव व इंधनाचे चढे दर याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे एडीबीने नमूद केले आहे. दरम्यान चीनचा विकास दर पाच टक्क्यांच्या ऐवजी 3.3 टक्के दराने होईल, असेही एडीबीने आपल्या अहवालात म्हटले आहे. झिरो कोविड धोरणामुळे चीनमधील अनेक शहरे बंद ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे रियल इस्टेट क्षेत्रातील संकट, कमी जागतिक मागणी याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडणार असल्याचे एडीबीने नमूद केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button