Pitbull, Rottweiler : या जातीच्या कुत्र्यांना पाळण्यास कानपूरमध्ये बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास दंड | पुढारी

Pitbull, Rottweiler : या जातीच्या कुत्र्यांना पाळण्यास कानपूरमध्ये बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास दंड

पुढारी ऑनलाईन डेस्क : कानपूर महानगरपालिकेने (KMC) शहरात पिटबुल आणि रॉटवेलर जातीच्या कुत्र्यांच्या पैदाशीवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला आहे. या ठरावात म्हटले आहे की, जर एखाद्याने या जातीच्या कुत्र्यांची पैदास केली तर त्याला पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल. त्याचबरोबर त्याचे लाडके कुत्रे देखील जप्त केले जाईल. आता हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून ते याबाबत औपचारिक आदेश लागू करतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

Pitbull आणि Rottweiler जातीचे कुत्रे पाळण्यास मनाई

कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वारंवार होणाऱ्या घटनांनंतर महापालिकेने धोकादायक समजल्या जाणाऱ्या या दोन जातींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशी भयानक प्रजातीचे कुत्रे ठेवण्यासाठी लोकांकडे आवश्यक एवढे मोठे घर किंवा फार्म हाऊस नाही, त्यामुळे ते तणावग्रस्त बनू लागतात. परिणामी कालांतराने ते लोकांवर हल्ला करतात. त्यामुळे कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जनतेचे रक्षण करण्यासाठी पिटबुल आणि रॉटविलर जातीचे शहराच्या सीमेबाहेर प्रजनन करण्यात येणार आहे. असे महापालिकेने या जातीच्या कुत्र्यांच्या बाबतीत जाहीर केलेल्या प्रस्तावामध्ये ही माहिती दिली आहे.

पालन ​​न केल्यास दंड आकारला जाईल

अतिरिक्त महापालिका आयुक्त सूर्यकांत त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनूसार, “शहरी भागात पाळीव आणि व्यापाराच्या उद्देशाने या दोन्ही प्रजातींच्या कुत्र्यांची पैदास करण्यास मनाई आहे. जर असा कोण व्यक्ती आढळून आला तर संबंधित व्यक्तीला दंड आकारला जाईल, त्याचबरोबर त्याचा पाळीव कुत्राही जप्त केला जाईल.”

यापूर्वी या कुत्र्यांनी हल्ले केलेल्या काही घटना

लखनौ, गाझियाबाद आणि मेरठमध्ये पिटबुल हल्ल्यानंतर नुकतीच एक घटना समोर आली आहे. कानपूरच्या सरसैया घाटावर एका गायीवर पिटबुलने हल्ला केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दुसऱ्या एका घटनेत काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये पिटबुलने पार्कमध्ये फिरणाऱ्या तरुणावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. तर काही दिवसांपूर्वी गाझियाबादमधील एका उद्यानात फिरणाऱ्या एका मुलावर पिटबुलने हल्ला करून त्याचा चेहरा ओरबाडला होता.

हेही वाचा

Back to top button