Mercedes accident : मर्सिडीज कारच्या धडकेत चक्क ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे... जाणून घ्या अपघाताचे रहस्य? | पुढारी

Mercedes accident : मर्सिडीज कारच्या धडकेत चक्क ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे... जाणून घ्या अपघाताचे रहस्य?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्रॅक्टर सोबत झालेल्या धडकेत नेहमी समोरच्या गाडीचे नुकसान झालेले पहायला मिळते. कित्येकदा कार आणि ट्रॅक्टरच्या अपघातात नेहमी कारचा चक्काचुर झालेले दिसून येते. तिरूपती मध्ये झालेल्या एका अपघातात चक्क मर्सिडीज कारला (Mercedes accident) धडकून ट्रॅक्टरचे दोन तुकडे झालेले पहायला मिळाले आहे. मजबूत समजल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर सोबत झालेल्या या भीषण अपघातामुळे कारच्या सुरक्षाविषयक फिचर्सबाबत सोशल मीडियावरील चर्चांना उधान आले आहे.

कसा झाला हा अपघात? (Mercedes accident)

आंध्र प्रदेश मधील तिरूपती येथील चंद्रगिरी बायपास रोडवर हा अपघात झाला. सोमवारी झालेल्या या दुर्घटनेत एक मर्सिडीज कार आणि ट्रॅक्टरची धडक झाली. चुकीच्या दिशेने येत असणाऱ्या ट्रॅक्टरने येणाऱ्या या कारला धडक दिली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरदार होती की, आसपासच्या अपघात पाहणाऱ्यांना याचा धक्काच बसला. याचे कारण असे की, या दुर्घटनेत मर्सिडीज कारला धडकलेल्या ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. तसेच ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली देखील रस्त्यावर पलटी झालेली होती. तुलनेने कारचे खूप कमी नुकसान झाले.

ट्रैक्टर और मर्सिडीज के बीच एक्सीडेंट

कारमधील लोक सुरक्षित

या कारमध्ये असलेले लोक किरकोळ जखमी झाले आहेत. पण या अपघातात चारचाकी मधील लोकांना फार काही इजा पोहचली नाही असे निदर्शनास आले आहे. मर्सिडीज कारच्या सुरक्षेविषयक फिचर्समुळे कारचे मोठे नुकसान टळले आहे. पण ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असल्याचे सांगितले जात आहे.

tractor accident

सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला ती देखील मर्सडीज कार

काही दिवसांपूर्वीच देशातील मोठे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांचा अपघात झालेली कार ही मर्सिडीज कंपनीची होती. तर दुसरीकडे तिरूपती येथील झालेल्या ट्रॅक्टर आणि कारच्या अपघात कोणतीही इजा कारमधील प्रवाशांना झाली नसल्याचे दिसून आले. इतकी सक्षम असून देखील सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला यावर सध्या प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत.

ट्रैक्टर और मर्सिडीज के बीच एक्सीडेंट

हेही वाचा

Back to top button